शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !

By admin | Updated: October 23, 2016 00:52 IST

सातारा पालिका : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत मनसेदेखील--पालिका धुमशान

मनोमिलनापुढे महायुतीचे आव्हान !सातारा पालिका : भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत मनसेदेखील--पालिका धुमशानसातारा : साताऱ्यातील मनोमिलनाच्या सत्तेला हादरा देण्यासाठी भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, स्वाभिमानी यांच्या महायुतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही सोबत घेतले आहे. सध्याच्या घडीला ‘जम्बो’ महायुतीतील जागा वाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात असून, सर्वधर्मीय व बहुपक्षीय महायुतीचे मनोमिलनापुढे आव्हान उभे ठाकले आहे. सातारा शहराची सत्ता ताब्यात असणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडी व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडी या दोन आघाड्यांचे या निवडणुकीतही मनोमिलन कायम टिकणार की त्यात काडीमोड होणार? याबाबत निश्चित धोरण ठरले नसले तरीही सत्ताधाऱ्यांविरोधात नवख्या उमेदवारांचे सक्षम पॅनेल उभे करण्याच्या घडामोडी घडल्या आहेत. केंद्र व राज्यात महायुतीची सत्ता आहे, या सत्तेत राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसली तरी साताऱ्यात मात्र भाजप नेत्यांनी एक पाऊल पुढे टाकत जम्बो महायुतीचा प्रयोग राबविला आहे. जागा वाटपाचा कच्चा आराखडा तयार झाला असला तरी महायुतीच्या एकत्रित बैठकीनंतरच ‘फायनल’ धोरण ठरले जाणार आहे. सातारा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप २५ जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी संख्या असल्याचा दावा भाजपमधील सूत्रांकडून केला जात आहे. भाजपमध्ये रीतसर प्रवेश मगच उमेदवारी, अशी अट भाजपतर्फे घालण्यात आली आहे. या पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी धनवंती पवार, नगरसेविका सुवर्णा पाटील, सिद्धी पवार यांची नावे आघाडीवर आहेत. तसेच शहराध्यक्ष सुनील काळेकर, धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, संजय लेवे, अप्पा कोरे, विठ्ठल बलशेटवार, महेश गोळे, अप्पा पानसकर, महेंद्र कदम आदींची नावे चर्चेत आहेत. ही यादी आणखी वाढणार आहे. शिवसेनेला फुटका तलाव परिसरात तसेच शाहू चौक, शुक्रवार पेठ, सोमवार पेठेत संधी दिली जाणार आहे. जाग वाटपात शिवसेनेच्या पारड्यात ६ जागा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरपीआयला सदर बझार, मल्हारपेठ येथील आरक्षित चार जागांवर संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करंजे, सदर बझार परिसरात संधी दिली जाऊ शकते. मनसेला दोन जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला बोगदा परिसरात दोन जागा दिल्या जाणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार साविआचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर यांच्याविरोधात दंड थोपटणार आहे. शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. शिरीष दिवाकर यांची लढत नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांच्याशी होण्याची शक्यता आहे. फुटका तलाव परिसरातून शिवसेनेचे शहराध्यक्ष किशोर पंडित किंवा त्यांच्या पत्नी नगरसेविका आशा पंडित यांची उमेदवार निश्चित होणार आहे. शाहू चौकात श्रीनिवास जाधव यांना संधी दिली जाणार आहे. सोमवार पेठेत शिवसेनेचे बाळासाहेब शिंदे यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. (प्रतिनिधी)चलो बुलावा आया है..भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने आपल्याकडे खेचल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून नगरसेवक पदावर संधी मिळाली असल्याने आता पक्षातून नाही तर आमच्या आघाडीतून निवडणूक लढा, असा सल्ला अनेकांना दिला गेला असल्याने त्यांची दोलायमान परिस्थिती आहे. निवडणुकीसाठी तरुणाईची सोशलगिरीसातारा : नगरपालिकेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत चित्रफितीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा फंडा काही नगरसेवकांनी अवलंबला होता. यंदा मात्र, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्वांशी रोजच्या रोज संवाद साधण्याचा प्रयत्न पालिका निवडणुकीतील हवसे-गवसे करू लागले आहेत. त्यामुळे मतदारांना रोज त्यांच्याकडून अभिवादन व शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण सुरू झाली आहे.मनोमिलन होणार का स्वतंत्र लढणार, आपल्याला तिकीट मिळणार का गाशा गुंडाळावा लागणार, मराठा क्रांतीमुळे उदयास आलेल्या नेतृत्वाला नेते शमवणार का नाचवणार याचा कसलाही अंदाज अद्यापही न आलेल्या काही इच्छुकांनी आपल्या घरातील तरुणाईला हाताशी घेऊन रोजच्या रोज सुप्रभात आणि शुभरात्रीच्या मेसेजची खैरात मांडली आहे. ब्रॉडकास्ट करण्यात येत असलेल्या या मेसेजमुळे एकावेळी एक पोस्ट तब्बल अडीचशे जणांना सहज मिळत आहे. त्यामुळे कमी वेळात जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून झाला असल्याचे दिसत आहे.निवडणूक आचारसंहिता आणि सोशल मीडियाचा वापर याचा सारासार अभ्यास करून वकिलांशी सल्लामसलत करणाऱ्यांचीही संख्या यंदा मोठी आहे. त्यामुळे खात्रीशीर तिकीट मिळविणाऱ्या उमेदवारांनी नागरिकांपर्यंत या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुकींना अजून महिन्याभराचा अवकाश असला तरीही मतदारांपर्यंत आपणच आधी पोहोचण्याची लगबग प्रत्येकाकडून होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)