शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कांदाटी खोऱ्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी चकदेव, पर्वतचा विकास साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकास होणे आवश्यक ...

सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोऱ्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील चकदेव व पर्वतचा विकास होणे आवश्यक आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे विकास साधण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील हे प्रयत्नशील असून याबाबत त्यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.

महाबळेश्वर तालुक्याच्या अतिदुर्गम कोयना-कांदाटी खोऱ्यात चकदेव व पर्वत ही शंकराची अतिप्राचीन मंदिरे आहेत. तसेच ही ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणूनही आकर्षित करत असतात. त्यामुळे येथे पर्यटक भेट देत असतात. येथे जाण्याासाठी अतिशय अरुंद वाट असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने स्थानिक विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून येथे आवश्यक सोयी-सुविधा निर्माण केल्या जाव्यात, अशी सूचना खा. पाटील यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हा‍ण यांना पत्राद्वारे केल्या आहेत. या परिसराचा विकास आराखडा तयार करून त्या अनुषंगाने वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आ. मकरंद पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन हा आराखडा अंतिम करण्यात यावा, अशी सूचनाही केली आहे. याशिवाय कांदाटी खोऱ्यात उचाट ते शिंदी या कोयना अभयारण्यातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे मंजुरीसाठी सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.