शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका गाडीसाठी सभापती अन् उपसभापतींच्या तडजोडी

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

पाटण पंचायत समिती : शासनाची गाडी वापरावरून राजकारण

अरुण पवार - पाटण -पंचायत समितीत देसाई व पाटणकर गटाचा फिप्टी-फिप्टी वाटा आहे. पहिल्या अडीच वर्षांचे सभापतिपद देसाई गटाकडे होतो. आता पाटणकर गटाच्या संगीता गुरव या सभापती आहेत. तर उपसभापती डी. आर. पाटील हे देसाई गटाचे आहेत. मात्र, या दोघांना शासनाची एकच गाडी असल्यामुळे त्या गाडीवरून कुरबुरी वाढल्या आहेत.आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्यातील राजकीय संघर्ष जिल्ह्याला माहीत आहे. पंचायत समितीच्या सत्तेतही यावेळी असाच संघर्ष सुरू आहे. सभापती, उपसभापतींच्या निवडी करायच्या झाल्यास त्याही चिठ्ठीवर म्हणजे नशिबावर अवलंबून होत्या. सध्याच्या सभापती संगीता गुरव यांचे गाव ढेबेवाडी विभागातील धामणी तर उपसभापती डी. आर. पाटील यांचे गाव महिंद हेही याच विभागातील. त्यामुळे हे दोघेही दररोज पाटणला ये-जा करून पंचायत समितीचा कारभार पाहतात. त्यांच्या दिमतीला असणाऱ्या शासनाच्या बोलेरो गाडीला तितकेच महत्त्व आहे. कारण खासगी गाडीपेक्षा शासनाच्या गाडीतून प्रवास करणे हे सभापती-उपसभापतींसाठी मानाचे आहे. पण नियमानुसार सभापतींनी वीस दिवस तर उपसभापतींना दहा दिवस गाडी वापरता येणार आहे. त्यामुळे आठवड्यातील अमूक दिवशी माझ्याकडे गाडी पाहिजे, असा हट्ट असल्यामुळे ही तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे गेली; पण ते तरी काय बोलणार? चालकाचे हाल होतायत. अजूनही हा तिढा सुटला नाही. मात्र, आजपर्यंत केवळ तडजोडीने गाडीचा वापर सुरू आहे. गटविकास अधिकारी व सभापती यांच्या समन्वयातून मला ठरवून दिलेल्या दिवशी माझ्या ताब्यात गाडी असावी. ठरलेल्या क्रमात कोणत्याही परिस्थितीत बदल होता कामा नये.- डी. आर. पाटील, उपसभापतीमला वीस दिवस गाडी वापरण्याचा अधिकार आहे. उपसभापतींना दहा दिवस गाडी दिली जाते. उपसभापतींनी सलग दोन दिवस गाडी वापरावी, असा प्रस्ताव मी ठेवला आहे.- संगीता गुरव, सभापतीसभापतींना असणारी गाडी उपसभापतींना महिन्यातून दहा दिवस द्यावा, असा अध्यादेश आहे. त्यामुळे त्या दोघांनी विचारविनिमय करून गाडी वापराचे वेळापत्रक ठरवावे.- अरविंद पाटील, गटविकास अधिकारी