केंद्र सरकारचे बजेट हे केवळ फुगवटा स्वरूपातील आहे. वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनाने संपूर्ण देशातील ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थाने त्रास झाला. आपलंच होईना तिथं ज्येष्ठांकडे कोण बघणार, अशी स्थिती होती. केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य विमा योजना राबवायला हवी होती. मात्र, या बजेटने ज्येष्ठांना दुर्लक्षित केले.
-शंकरराव पाटील, ज्येष्ठ नागरिक
कोट..
केंद्र शासनाने बजेटमध्ये डिसेल आणि पेट्रोल दोन्हींवर कृषी सेस वाढवला आहे. मात्र, एक्साईज कर कमी केला असल्याने इंधनाच्या किमती वाढतील, असे वाटत नाही. तरी देखील देश आर्थिक गर्तेत सापडू नये म्हणून दूरचा विचार करून केंद्र शासन वाटचाल करत असल्याचे दिसून येते. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. मात्र, देशाची आर्थिक उन्नतीदेखील महत्त्वाची आहे.
- रितेश रावखंडे,
उपाध्यक्ष, जिल्हा पेट्रोलियम असोसिएशन.