शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जावळीत अनोख्या पद्धतीने होणार रक्षाबंधन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 16:54 IST

सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देगटविकास अधिकाºयांचा उपक्रमवृक्ष लावून राखी बांधून रक्षाबंधन करावा साजरासंगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकवर

सायगाव : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे... वनचरे,’ या संत तुकारामांच्या ओवीप्रमाणे सर्व झाडेझुडपे हे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे घटक आहेत. पर्यावरणात होणारे बदल रोखण्यासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या उद्देशानेच जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायची आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

     नैसर्गिक आपत्तीत वाढ, तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ व इतर विपरीत बदल पर्यावरणात घडताना दिसत आहेत. यावर एकच उपाय म्हणजे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा आहे. रक्षाबंधन या सणाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे. त्यामुळे या सणाचे महत्त्व ओळखून व औचित्य साधून नूतन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सात आॅगस्टला किमान एक तरी झाड लावून त्या झाडाला राखी बांधून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक यांनी घेऊन रक्षाबंधन साजरा करावा, असे परिपत्रक काढले आहे.

    शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे नवनवे उपक्रम या निमित्ताने राबवून तसे राबवल्याचे पंचायत समितीस अवगत करण्याच्या सूचना देखील बुद्धे यांनी केल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक व स्वागत होत आहे. तालुक्यातील शाळा देखील हा उपक्रम राबवण्यासाठी तयारीला लागल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन हे मूल्य समजवणे हा आपल्या मूल्यशिक्षणाचा भाग आहे. त्यादृष्टीने हा अनोखा उपक्रम तालुक्यात राबवला जात आहे. त्यानुसार हा उपक्रम सक्तीने राबण्यासंदर्भात शाळांना सूचना देखील केल्या आहेत.     - सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी जावळी