शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्ष्यांसाठी पाणवठे उभारून रंगोत्सव साजरा : ‘पक्षी वाचवा’चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:59 IST

लोणंद : दिवसेंदिवस वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडेझुडपे अन् नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पशुपक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे वास्तव ओळखून लोणंद

ठळक मुद्देलोणंदच्या सार्थ प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम

लोणंद : दिवसेंदिवस वाढत चाललेले कडक उन्हाचे चटके, निष्पर्ण होत असलेली झाडेझुडपे अन् नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागल्याने पशुपक्ष्यांना आपला जीव वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हे वास्तव ओळखून लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठानच्या वतीने अनोखी रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंगपचमीत पाण्याचा अपव्यय न करता वृक्षांवर अन् जमिनीवर चारा व पाणवठे उभारून प्रतिष्ठानच्या वतीने ‘पशुपक्षी वाचवा... निसर्ग वाचवा,’ असा संदेश देण्यात आला आहे.

पूर्वी शेकडो जातीचे पशुपक्षी पाहावयास मिळायचे. पक्ष्यांच्या किलबिलीने प्रसन्न वाटायचे; मात्र आज परिस्थिती उलट होऊन बसली आहे. मानवी संस्कृतीत पिंडाला शिवणारा कावळाही दुर्मीळ होऊन बसला आहे. मानवाने आपल्या स्वार्थासाठी सर्व सुख-सुविधा जागेवरच उपलब्ध करून घेतल्या; मात्र या मुक्या पशुपक्ष्यांचे काय? असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. उन्हाच्या चटक्याने सध्या वन्यजीव, पशुपक्ष्यांची भटकंती सुरू झाली आहे. कुणी पाणी देता का पाणी? अशी आर्त हाक मारणाºया मुक्या जीवांना आता पाणवठे, थोडे धान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवारी अनोख्या पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला.

सर्वत्र पाण्याची नासाडी व रंगांची उधळण केली जात असताना लोणंद व परिसरात प्रतिष्ठानच्या वतीने पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहे. इतकेत नव्हे तर या पक्ष्यांसाठी खाद्याचीही व्यवस्था केली आहे. सार्थ प्रतिष्ठानच्या या ‘पर्यावरणपूरक रंगोत्सवा’चे नागरिकांमधून कौतुक होत आहे.लोणंद येथील सार्थ प्रतिष्ठानच्या वतीने झाडांवर पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून रंगपचमी साजरी करण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी खाद्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.