शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेसाठी गोवे गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित

By admin | Updated: June 16, 2016 00:58 IST

गुन्हेगारांवर राहणार वॉच : जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत; प्रत्येक हालचालीवर लक्ष

सातारा : महामार्गालगत असलेल्या गोवे, ता. सातारा ग्रामपंचायतीने आधुनिक जगाशी नाळ जोडत आदर्श गावाकडे वाटचालीची घोडदौड सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला साथ देत ग्रामपंचायतीने सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली. ‘हा उपक्रम राबविणारी गोवे ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. महामार्गालगत गोवे गाव असून, सीसीटीव्ही बसविल्याने गावात चाललेल्या प्रत्येक हालचालींवर आता लक्ष राहणार आहे. यामुळे गावात गुन्हे घडण्याचे प्रमाण निश्चित कमी होणार आहे. महामार्गावरून लोणंद-कोरेगाव आणि पुढे जाण्यासाठी याच गावातून जावे लागत असल्याने आता गावातून जाणारा प्रत्येकजण सीसीटीव्हीत कैद होणार आहे. याचा फायदा महामार्गावर होणाऱ्या गुन्हेगारांची उकल करण्यासाठी तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. गोवे ग्रामपंचायतीचा आदर्श लगतच्या गावांनी घेण्यासारखा आहे. ग्रामपंचायतीने यापूर्वी ‘वाय-फाय’ यंत्रणा सुरू केल्यामुळे अनेकांना गावच्या विविध विकासकामांची, प्रकल्पांची तसेच लोकांच्या कामांची माहिती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिली जात आहे. मोबाईल क्रमांकावर गावचे दाखले, नोंदी आणि ग्रामस्थांच्या तक्रारी नोंदविल्या जात आहेत,’ असे मत सातारा सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी व्यक्त केले.सरपंच आशा जाधव, ग्रामसेवक विकास चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन जाधव, पोलिस पाटील राजेंद्र जाधव, विवेक जाधव, एकनाथ जाधव, महेंद्र पवार, मधुकर जाधव, हंबीरराव जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)