शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरातील गुहेवरून कोसळतोय धबधबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:57 IST

पर्यटकांचे आकर्षण : तोंडोशीत निसगार्चा अद्भूत आविष्कार

आॅनलाईन लोकमततारळे (जि. सातारा), दि. १८ : तोंडोशी, ता. पाटण येथील रामघळ डोंगरावरून पडणारे दोन धबधबे सध्या पर्यटकांचे आकर्षण बनले आहेत. निसर्गाच्या या अद्भुत देणगीचा आनंद लुटण्यासाठी जिल्हाभरातून पर्यटक येथे भेट देत आहेत. राज्यातील सात प्रमुख घळींमध्ये येथील रामघळीचा उल्लेख केला जात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.तारळे गावापासून सुमारे बारा किलोमिटर अंतरावर तारळी धरणालगत तोंडोशी गाव आहे. या गावापासुन सुमारे एक किलोमिटरवर दक्षिणेला डोंगररांगांमध्ये रामघळ आहे. अत्यंत प्रेक्षणीय अशी ही जागा असून याठिकाणी समर्थांचे वास्तव्य होते, असे सांगीतले जाते. पुर्णपणे दुर्लक्षित असलेली ही रामघळ गत काही वषार्पासुन पर्यटकांचे आकर्षण बनली आहे. तारळी धरणाकडे आलेले पर्यटक आवर्जुन याठिकाणी भेट देतात. येथील विलोभनिय निसगार्चा आस्वाद घेतात. रामघळीकडे जाण्यासाठी काही वषार्पासून ग्रामस्थ श्रमदानातून रस्ता करीत आहेत. सध्या या रस्त्याचे काम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे. डोंगरात अर्धा किलोमिटरपर्यंत वाहन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पर्यटकांना चालतच जावे लागते. रामघळीवरून कोसळणारे दोन्ही धबधबे लांबूनच दृष्टीस पडतात. त्यामुळे त्याठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांमध्ये आतुरता निर्माण होते. हे धबधबे पर्यटकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतात. उत्तराभिमुख रामघळीमध्ये प्रभु राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या आकर्षक मुर्ती आहेत. तसेच पश्चिममुखी हनुमानाची दगडी मुर्ती असून स्वयंभू शिवलिंगही आहे. गगनगिरी महाराजांचे शिष्य राजेंद्रगिरी यांचे या गुहेत वास्तव्य आहे. रामनवमी, गुरूपौर्णिमा व इतर धार्मिक उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. रामघळीवरून पडणारे दोन नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढत चालला आहे. इतर धबधब्यांप्रमाणे पडणारे पाणी धोकादायक नसल्याने पर्यटक येथे आवर्जुन भेट देताना दिसत आहेत. रामघळ व त्यावरून कोसळणारे दोन धबधबे आकर्षक असुनही रहदारीअभावी ते दुर्लक्षित राहिले होते. काही वषार्पासून ग्रामस्थांनी रहदारीसाठी रस्ता बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पर्यटक आता येथे भेटी देऊ लागले आहेत. कितीही तीव्र दुष्काळ असला तरी रामघळीवरून कोसळणाऱ्या धबधब्यातून थोड्या प्रमाणात का होईना, पाणी वाहत असते. - मारूती भोसलेसरपंच, तोंडोशी