मायणी : मायणी जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांच्या प्रयत्नातून मायणी अंतर्गत सिमेंट व डांबरीकरणासाठी दोन कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे सिमेंट पाच महिन्यांच्या आतच वाहून चाललेले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.मंजूर कामे सध्या सुरू आहेत. या कामांतर्गत शेडगेवाडी रस्ता ते मुराद बागवान यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यासाठी आदेश मिळाला आहेत. त्यानंतर या कामास जून-जुलैमध्ये सुरुवात होऊन पूर्ण झाला; पण आज पाच महिन्यांच्या आतच या रस्त्याचे सिमेंट वाहून चाललेले आहे. तसेच खडी ही उघडी पडलेली आहे. या कामात सिमेंटचे प्रमाण व वाळू निकृष्ट दर्जाची वापरण्यात आल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीने व जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे यांनी लक्ष घालून निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)
पाच लाखांचे सिमेंट चालले वाहून
By admin | Updated: November 28, 2014 23:53 IST