शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कार पलटताच मदतीला धावली भोसलेवाडी

By admin | Updated: February 18, 2015 23:48 IST

पाच जखमी रुग्णालयात कोर्टी येथील अपघातात एक ठार

उंब्रज : पुणे-बंगळूर महामार्गावर कोर्टी गावाच्या हद्दीत कारचा टायर फुटला रात्रीच्या अंधारात झालेल्या या अपघातात कोर्टी व भोसलेवाडीचे ग्रामस्थ मदतीला धावून आले. अपघातात एक जीव गेला पण पाच जण वाचले. कार महामार्गावरून उपमार्गावर आली. कार पलटी घेतल्याने गाडीतील एकजण गाडीच्या खिडकीतून उपमार्गावर फेकला गेल्याने जागीच ठार झाला. तर पाच गंभीर जखमी झाले. दरम्यान, काही अंतरावर असलेल्या युवकांनी जखमींना तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात पोहोचविले. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारचा (एमएच ११ वाय १७१) टायर कोर्टी गावाजवळ फुटला. कार सुमारे १५ फूट खाली उपमार्गावर कोसळली. तोपर्यंत कार पूर्ण फिरली होती. या दरम्यानच कारमधून अक्षय जगदीश संघवी (वय १५, रा. गुरुवार पेठ) हा खिडकीतून बाहेर फेकला गेला. सुमारे वीस फूट लांब फेकल्यामुळे तो जागीच ठार झाला. दरम्यान, या घटनेनंतर मोठा आवाज झाला. भोसलेवाडी फाट्यानजीक असलेले युवक विशाल भोसले, सनी भोसले, सचिन भोसले, गणेश भोसले, विठ्ठल तलवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.विशाल भोसले व त्यांच्या मित्रांनी कारमधील संघवी कुटुंबीयांना प्रथम बाहेर काढले. विशाल भोसले यांनी तातडीने १०८ क्रमांकावर फोन केला. व पोलिसांनाही याची माहिती दिली. घटनास्थळी तत्काळ रुग्णवाहिका आली. तोपर्यंत या युवकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील संघवी कुटुंबीयांना मानसिक आधार दिला. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना त्यात बसवून कऱ्हाड येथील रुग्णालयात आले.या अपघातात चालक विजय भाऊसाहेब म्हेत्रे (वय २३, रा. शुक्रवार पेठ, कऱ्हाड), जगदीश शांतीलाल संघवी, चंदन जगदीश संघवी (वय ३२), पायल जगदीश संघवी (वय १३), सुजल जगदीश संघवी (वय ८, सर्व रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)कोर्टी, भोसलेवाडी ग्रामस्थांची माणुसकीकोर्टी ग्रामस्थ व भोसलेवाडी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे जखमींना दवाखान्यात तातडीने दाखल करण्यात आले. अशीच सामाजिक बांधिलकी समाजाकडून अपेक्षित असते.लोकमतइनिशिएटीव्ह