शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नागझरी घाटात कार पेटली

By admin | Updated: March 5, 2017 23:13 IST

प्रवासी सोडून जाताना अपघात : चालत्या गाडीतून उडी घेतल्याने चालक बचावला

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील पुसेसावळी-नागझरी दरम्यान असलेल्या घाटातून येत असलेल्या एका कारमधून रविवारी सकाळी अचानक धूर येऊ लागला. धूर आणि जाळ दिसताच चालक सचिन शिंदे यांनी चालत्या गाडीतून उडी घेतली. त्यानंतर काही क्षणात कार जळून खाक झाली. शिंदे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने ते थोडक्यात बचावले.रहिमतपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन रामचंद्र शिंदे (वय ३५, रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव) हे रविवारी (दि. ५) लोणंद येथून भाडे घेऊन पुसेसावळी येथे सोडायला गेले होते. प्रवासी पुसेसावळी येथे सोडून ते पुन्हा कण्हेरखेड या त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी कार (एमएच १४ सीएक्स ६११३) मध्ये सचिन शिंदे हे एकटेच होते.त्यांची कार सकाळी साडेनऊच्या सुमारास नागझरी घाटात आली असता अचानक धूर येऊ लागला. धूर कोठून येत आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता जाळ दिसू लागला. यावेळी शिंदे यांनी चालत्या कारमधून उडी घेतल्याने ते वाचले. त्यानंतर त्यांनी कार रस्त्यावरच सोडून माळरानात पळ काढला. प्रवाशांना यापूर्वी सोडले असल्याने मोठा अनर्थ टळला. शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वीच नवीन कार खरेदी केली होती. आगीच्या दुर्घटनेमध्ये सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या घटनेची रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार एस. जे. शिंदे तपास करत आहेत. (वार्ताहर)