शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कार कालव्यात

By admin | Updated: June 4, 2015 00:01 IST

कार्वे चौकीतील दुर्घटना : चार गंभीर; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

कार्वे : तासगावहून कऱ्हाडकडे येणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून कार कालव्यात कोसळली. कऱ्हाड-तासगाव मार्गावर कार्वेचौकी, ता. कऱ्हाड येथे बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.सुधीर पांडूरंग पाटील, धोंडीराम रघुनाथ पाटील (रा. वसगडे, ता. तासगाव) यांच्यासह अन्य दोघांचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वसगडे येथील सुधीर पाटील यांच्यासह चारजण बुधवारी पहाटे कारमधून (क्र. टीएन ०४ एएफ ३६६९) पुण्याला निघाले होते. तासगाव मार्गावरून ते कऱ्हाडला येत असताना कार्वेचौकी येथे असलेल्या धोकादायक वळणावर अचानक कारचा टायर फुटला. त्यामुळे चालक सुधीर पाटील यांचा ताबा सुटून कार कालव्याच्या पाण्यात कोसळली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.त्यांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. उपचारार्थ त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कार्वेचौकी येथे कालव्यावर असणारा पुल सध्या धोकादायक बनला आहे. या पुलाचे संरक्षक कठडे यापुर्वीच तुटले आहेत. त्यामुळे धोकादायक वळण व पुलाला संरक्षक कठडेच नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वीच एका दुचाकीस्वाराचा येथे गंभीर अपाघात झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)वर्षभरात ३६ अपघातवर्षभरात येथे सुमारे ३६ अपघात झाले आहेत. पुलाला संरक्षक कठडे उभारण्याची मागणी वारंवार केली जाते. मात्र, त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे कार्वेचे सरपंच वैभव थोरात व संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगीतले.