शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

जगाचे नेतृत्व करण्याची महिलांमध्ये क्षमता : थोरात

By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST

ताराराणी विद्यापीठातर्फे सन्मान : उषा थोरात यांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या असंख्य महिलांनी समाजाशी संघर्ष करून शिक्षणाचा हक्क आणि समानतेचा अधिकार मिळविला आहे. महिलांमध्ये असलेल्या क्षमतांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करून त्या जगाचे नेतृत्व करू शकतात, असा विश्वास रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केला. येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनमध्ये शनिवारी ताराराणी विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांना ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ‘नाबार्ड’चे माजी चेअरमन डॉ. यशवंत थोरात, डॉ. एस. एन. पवार, प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्राजक्त पाटील, डी. आर. मोरे उपस्थित होते. रोख रक्कम रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. उषा थोरात म्हणाल्या, महिलांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्यामध्ये असणाऱ्या मातृत्व, संवेदनशीलता, संयम आणि शांतता, प्रामाणिकपणा या गुणांमुळे त्या सर्वांना सोबत घेऊन विकास साधतात. मला मिळालेला हा पुरस्कार तळागाळात राहून संघर्ष करणाऱ्या महिलांना समर्पित आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, सत्याचं तोंड सुवर्णाच्या थाळीने बंद झालेले आहे, हे वचन खोडून काढण्याचे काम उषा थोरात यांनी केले आहे. भांडवलशाहीच्या मुजोरीने राज्यकर्त्यांचे तोंड नोटांनी बंद केले आहे. अशा परिस्थितीत बँकिंग हे क्षेत्र अतिशय संवेदनशील बनले आहे. या क्षेत्रात उच्चपदस्थ राहून थोरात यांनी तत्त्वांशी तडजोड न करता कर्तृत्व सिद्ध केले आहे. यशवंत थोरात यांनी, उषा थोरात या एक बँक अधिकारी म्हणून कर्तृत्ववान आहेतच; पण एक पत्नी, मुलगी, सून, आई अशा नात्यांचे अनेक पदर सांभाळत त्यांनी कुटुंब व्यवस्थेलाही न्याय दिला असल्याचे मनोगत व्यक्त केले. डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. चव्हाण यांनी गौरवपत्राचे वाचन केले. अंजली साठे व पौर्णिमा मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. अंजली साठे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)उषा थोरात यांच्या यशस्वीतेच्या गुरुकिल्ल्या शिक्षण फक्त मार्कांसाठी घेऊ नका, संवाद वाढवा.शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला प्रोत्साहन द्या. शक्य तेवढे जास्त वाचन करा, अभ्यास करा.स्वतंत्र विचारशक्तीने निर्णय घ्या आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. चांगल्या गोष्टींची पाठ सोडू ाका.तत्त्वांशी तडजोड करू नका. पारदर्शकपणे कारभार सांभाळा.मेहनतीला पर्याय नाही. त्यावरच तुमचे यश अवलंबून आहे.