शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कालवा भरला...अन् विहिरी आटल्या!

By admin | Updated: January 6, 2017 23:11 IST

आदर्कीत विरोधाभास : धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्याची मागणी

सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्कीआदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या धोम-बलकवडी कालव्यात सालपे ते बिबीपर्यंतचे नैसर्गिक पाणी पाझरत असल्याने दहा किलोमीटर कालवा पाण्याने भरला आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्यावर झाल्यामुळे ‘कालवा भरला अन् विहिरी आटल्या’ असा विरोधाभास निर्माण झाला आहे. विहिरीतील पाणीसाठा टिकून राहावा, यासाठी कालव्याचे तत्काळ अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.माजी आमदार शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, कृष्णचंद्र भोईटे, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार चिमणराव कदम यांनी ‘कृष्णेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून शासनाच्या पटलावर पाणी प्रश्न सतत लावून धरला. त्यानंतर काँग्रेसची सत्ता १९९५ जाऊन भाजप-शिवसेना युती शासन अपक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले. यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून धोम-बलकवडी प्रकल्पास मंजुरी मिळून धरणाच्या कामास सुरुवात झाली.धोम-बलकवडी उजव्या कालव्याचे फलटण, खंडाळा तालुक्यात सर्वेक्षण झाले. त्यानंतर कालव्याचे फेर सर्वेक्षण होऊन सालपे ते आळजापूरपर्यंत ५०० ते १००० मीटर कालवा गावाजवळून घेण्यात आला. त्यामुळे पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट बंधारे कालव्याच्या वरील बाजूस राहिले. तर कालवा जमिनीपासून २० ते ४० फूट खोलीवरून गेल्यामुळे ओढा-नाल्याचे पाणी कालव्यात पाझरू लागले. याचा परिणाम विहिरींच्या पाणीपातळीवर झाल्याचे दिसून येत आहे. सध्या कालव्यात पाणी असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. विहिरीतील पाणीसाठा टिकून रहावा, यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.उपाययोजनेची गरज आदर्कीसह परिसरातील अनेक विहिरी उन्हाळ सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडल्या आहेत. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुरू असले तरी कालव्याची खोली अधिक असल्याने हे पाणी विहिरींऐवजी कालव्यात पाझरत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कालव्याचे अस्तरीकरण केल्यास हे संकट टळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.