शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

पाटणमध्ये मंत्रिमंडळ; पण पाटणला मंत्रिपद केव्हा?

By admin | Updated: November 20, 2015 00:14 IST

कार्यकर्त्यांना लागले वेध : गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्हा लाल दिव्यापासून वंचित

पाटण : राज्याच्या निर्मितीनंतर नेहमीच सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना लालदिवा मिळाला; पण गेल्या एक वर्षापासून सातारा सत्तेपासून वंचितच राहिला आहे. याची तीव्रतेने आठवण होण्याचे कारण म्हणजे पाटण तालुक्यात शुक्रवारी मंत्रिमंडळ येत आहे. अशावेळी राज्यात युतीचे सरकार असताना जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकमेव आमदाराला मंत्रिपद केव्हा? असाच प्रश्न समोर येत आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी राज्याची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर अनेक वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले. १९६० नंतर २०१४ पर्यंत राज्याला सातारा जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिले. तसेच महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याला नेहमीच मंत्रिपदही मिळाले. त्यामध्ये बाळासाहेब देसाई, विलासराव पाटील-उंडाळकर, अभयसिंहराजे भोसले, मदनराव पिसाळ, रामराजे नाईक-निंबाळकर, विक्रमसिंह पाटणकर आदींपासून ते आतापर्यंतच्या म्हणजे शशिकांत शिंदे यांच्यापर्यंतचा समावेश आहे. मात्र, २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि राज्यात युतीची सत्ता आली. जिल्ह्यात युतीचा एकच आमदार निवडून आला, ते शंभूराज देसाई यांच्या रूपाने. मात्र, गेल्यावर्षी त्यांचा काही मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. त्यातच अनेक वर्षांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही परजिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला मिळाले. पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे साताऱ्याचे पालकमंत्री झाले. शिवतारे हे शिवसेनेचे आहेत. पाटण तालुक्यातील मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहेत. त्याचबरोबर महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आदींसह १५ मंत्री पाटणला येत आहेत. अशावेळी ‘पाटणला मंत्रिमंडळ येणार; पण पाटणला मंत्रिपद केव्हा मिळणार?’ असा प्रश्न युतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात तरी आमदार शंभूराज देसाई यांना स्थान मिळणार का? याकडे जिल्ह्याचेच लक्ष लागून राहिलेले आहे. (प्रतिनिधी)शंभूराज देसाई यांचे नावे चर्चेत होते...२०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी पाटणमधून शंभूराज देसाई हे आमदार म्हणून निवडून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेवेळी आमदार देसाई यांचे नाव चर्चेत होते; पण पुढे काहीच झाले नाही. आता होणाऱ्या विस्तारात तरी त्यांना लालदिवा मिळणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.