शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत १६९ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

By admin | Updated: February 24, 2016 00:24 IST

सातारकरांवर करवाढ नाही : शासनाच्या अनुदानाचाच हिस्सा मोठा

सातारा : पालिकेने नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या कराचा बोजा न टाकता १६८ कोटी ८८ लाख ९४ हजार ४९४ रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पाला मंगळवारी सर्वानुमते मान्यता दिली. नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली छ. शिवाजी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांनी हा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात शहराचे कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याचे नियोजन नसल्याचा तकलादू आरोप विरोधकांनी केला. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या विनंतीवरून विरोध ‘म्यान’ झाला. या अर्थसंकल्पातही पालिकेच्या स्वउत्पन्नापेक्षा शासनाच्या अनुदानाच्या ‘उत्पन्नाचा’ वाटाच जास्त आहे. मुद्रांक शुल्क अनुदान, रस्ते अनुदान, १४ वा वित्त आयोग, कास धरण उंची वाढविणे अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान, सहायक अनुदान, युआयडीएसएसएमटी अनुदान, अमृत योजना, नगरोत्थान अभियान आदी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर सातारा पालिकेच्या अर्थसंकल्पाचा वारू तग धरून राहणार आहे. पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे बजेट असा सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाचा उल्लेख केला, तसेच गेल्या पाच वर्षांच्या काळात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकास कामे ताकदीने मांडल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी ताकदीने मांडली. तर या बजेटवर पालिकेच्या ठराविक लोकांचा प्रभाव असून, इतरांना वंचित ठेवण्यात आल्याची विवंचना विरोधकांनी ‘शायरी’तून मांडली. विशेष म्हणजे शहरात नसलेल्या भुयारी गटर योजनेवर झालेला ६ लाखांचा खर्च, पालिकेच्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या पोहण्याच्या तलावाच्या ‘मेंटेनन्स’वर झालेला साडेआठ लाखांचा खर्च, शहरात वारंवार उफाळून येणारी रोगराई, शहरात अनधिकृत फलकांमुळे बुडणारे उत्पन्न, अनधिकृत बांधकामे याविषयी विरोधकांनी चकार शब्द काढला नाही. सत्ताधाऱ्यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंजूर केलेल्या या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने त्यापूर्वी मतदारांना दुखविणे योग्य नाही, असाच पवित्रा बहुतांश नगरसेवक-नगरसेविकांनी घेतला. साहजिकच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकल्याची जाणीव अनेकांना झाल्याचे यानिमित्ताने पुढे आले. (प्रतिनिधी)शिक्षणावर केवळ १ टक्का!पालिकेने संपूर्ण बजेटच्या केवळ १ टक्का निधी शिक्षणासाठी राखीव ठेवला आहे. पालिका मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत किती ‘आग्रही’ आहे, हे या निमित्ताने समोर आले आहे.