शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
5
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
6
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
7
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
8
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
9
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
10
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
11
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
12
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
13
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
14
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
15
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
16
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
17
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
18
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
19
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
20
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 

खरेदी तुमची... दिवाळी आमची !

By admin | Updated: October 18, 2016 22:32 IST

सातारकरांनो सावधान : दिवासाढवळ्या फ्लॅटमध्ये होतेय चोरी; खबरदारी घेण्याचे पोलिसांचे आवाहन

सातारा : दिवाळीची चाहूल लागल्यानंतर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. याच संधीचा मुहूर्त साधून चोरट्यांनी बंद फ्लॅट टार्गेट केले असून, काही क्षणातच दिवसाढवळ्या घरातील ऐवजावर डल्ला मारला जात असल्याचे प्रकार शहरात वाढत आहेत. विशेषत: महिलांनी घराबाहेर जाताना शेजाऱ्यांना सांगून बाहेर पडावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीच्या धामधुमीमध्ये सर्वजण व्यस्त असतात. काहीजण खरेदीसाठी दिवसभर बाहेर असतात तर काहीजण परगावी जात असतात. त्यामुळे बारा ते चोवीस तास घरांना कुलपे असतात. याच संधीचा फायदा चोरटे पुरेपूर उठवत आहेत. अपार्टमेंटमध्ये रात्री अन् दिवसा शहरात बंद बंगले, फ्लॅट किती आहेत, हे चोरटे हेरत असतात. त्यानंतर पाळत ठेवून दिवसाढवळ्या संबंधित फ्लॅटमध्ये चोरी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढत असून, त्यामुळे पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर पोलिसांना बंदोबस्त लावणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून स्वत: काळजी घेतली पाहिजे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.विसावा नाका, सत्वशील नगर, भू-विकास बँक परिसर, शाहूपुरी या ठिकाणी आत्तापर्यंत दिवसाढवळ्या बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. यातील काहीजण दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते, असे पोलिसांनी सांगितले.या घटनांनमध्ये दागिन्यांसह रोकड य घरातील मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. दरवर्षी दिवाळीच्या कालावधीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे नागरिकांनीच सतर्क राहायला हवं, असं पोलिसांचं म्हणणे आहे. नागरिकांनी घरातून बाहेर जाताना सुरक्षेची योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)गार्डन सिटीमध्ये दिवसा चोरीयेथील नकाशपुरातील गार्डन सिटीमध्ये राहणाऱ्या अस्मिता संजय खडसे यांचा दि. १४ रोजी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडला. खडसे या काही कामानिमित्त दुपारी बारा वाजता बाहेर गेल्या होत्या. दुपारी चार वाजता त्या परत आल्या त्यावेळी त्यांच्या घरातून साठ हजारांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.काय काळजी घ्याल...४सेफ्टी दरवाजा बसवावा.४बाहेर जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. ४घरात दागिने, रोकड ठेवू नये. ४अलार्म सिस्टीम बसवावी.४अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक नेमावेत.४सेल्समनला इमारतीच्या आवारात प्रवेश देऊ नये.४संशयित दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.