शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला स्थिर बाजारपेठ मिळावी

By admin | Updated: April 5, 2016 00:52 IST

पृथ्वीराज चव्हाण : प्रतापगड कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता; ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन

सातारा : ‘ऊस पिकविणारा शेतकरी व या उसावर प्रक्रिया करून साखर उत्पादन करणारा सहकारी साखर उद्योग हे दोन्ही घटक परस्परांवर अवलंबून आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या साखर उद्योगाचे अर्थकारण बाजारातील साखरेच्या भावावर तर या भावावर शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊसदर अवलंबून असतो. यासाठी केंद्र व राज्य सरकारने उसाच्या एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) मध्ये व्यवहारीकता आणून साखरेला स्थिर बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घेतलेल्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाची सांगता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीचे विधिवत पूजन करून झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सहकारी साखर उद्योग हा सहकार चळवळीचा पाया आहे. आघाडी शासनाच्या काळात सहकारात काम करणाऱ्या काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थासाठी सहकारी साखर कारखाने मोडीत काढून त्याचे खासगीकरण केले. त्याचवेळी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व सहकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजारी सहकारी साखर कारखाने सहकारात ठेवण्याची भूमिका मी घेतली. त्यातूनच प्रतागपड व खंडाळा साखर कारखाना सहकारात जिवंत राहिला. मदन भोसले यांनी थोरल्या भावाच्या भूमिकेतून प्रतापगड तर सक्षमपणे चालविलाच, शिवाय खंडाळा कारखाना लवकरच सुरू होत आहे.’ मदन भोसले म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मालकीच्या प्रतापगड कारखान्यामध्ये चार हंगाम आम्ही अडचणीत सापडला तरी शेतकरी, हितचिंतक, ऊस तोडणी मजूर, वाहनधारक, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे यशस्वी झाला. प्रारंभी पृथ्वीराज चव्हाण व अन्य मान्यवरांच्या हस्ते चार लाख, एकशे अकरा साखरपोत्यांचे पूजन करण्यात आले. प्रतापगडमध्ये चालू गळित हंगामात दैनंदिन सरासरी २,७१५मेट्रिक टनाने १३५ दिवसांत ३ लाख ५८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ५०० क्विंंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के मिळाला. यावेळी सर्वाधिक ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन ट्रॅक्टर गाडीवान व बैलगाडीवान यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तिन्ही कारखान्यांचे सभासद शेतकरी, मजूर, कर्मचारी उपस्थित होते.