शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भोसगावला साकारतंय फुलपाखरू उद्यान

By admin | Updated: May 29, 2015 23:58 IST

राज्यात पहिलाच प्रकल्प : वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाला चालना

सणबूर : भोसगाव, ता. पाटण येथे निसर्गाच्या कुशीत पहिले फुलपाखरू उद्यान साकारत आहे. सध्या या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांतच हे उद्यान पर्यटकांसह अभ्यासकांसाठी खुले होणार आहे. सध्या निसर्ग पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे पहिले पाऊल समजले जात आहे. भोसगाव येथील वनविश्रामगृहाच्या बाजूला हे निसर्ग पर्यटन केंद्र साकारण्यात येत आहे. यासाठी सुमारे १ कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. वनविभागने यासाठी मंजूरी दिली आहे. त्यातूनच निसर्ग पर्यटन केंद्राचे काम वेगाने सुरू आहे. या केंद्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरू उद्यान हे मुख्य वैशिष्ठ्य असणार आहे. त्याचबरोबर पश्चिम घाटातील दुर्मिळ जैवविविधतेची माहिती या पर्यटन केंद्रामध्ये प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर वन्य प्र्राण्यांची शिल्पे, विविध वनस्पतींचे जतन या केंद्रामध्ये करण्यात येणार आहे. भोसगाव येथील वनदक्षता समितीची या केंद्रावर निगराणी असणार आहे. पावसाळ्यात निसर्ग केंद्राचे खरे सौंदर्य पर्यटकांना पहावयास मिळणार आहे. भविष्यात येथील पर्यटन केंद्रामध्ये अभ्यासक व पर्यटाकांचा मोठा ओढा वाढणार आहे. वांग खोऱ्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने हे पहिले पाऊल समजले जात आहे. यामुळे छोट्या व्यवसायांना चालना मिळणार आहे. (वार्ताहर)