शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर बर्निंग कारचा थरार!

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कारने अचानक पेट घेतला

मलकापूर : कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून कार महामार्गाकडेला थांबवली. गाडीतील महिलांसह सहाजण बाहेर पडताच आगीने रौद्ररूप धारण केले. काही कळण्याअगोदरच कार जळून खाक झाली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हायवेवरील बर्निंग कारच्या थरारामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू येथील दिनेश परशुराम बारी हे कारमधून (एमएच ०४ सीजी ८०४०) कुटुंबासह कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. महालक्ष्मीचे देवदर्शन आटोपून ते परत डहाणूकडे जात होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोटे, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत आले असता गाडीच्या बॉनेटमधून धूर निघत असल्याचे चालक राजू लक्ष्मण वर्सा यांच्या निदर्शनास आले. गाडी काही अंतरावर तशीच नेली असता जास्तच धूर येत असल्याने चालकाने गाडी हायवेकडेला थांबवली. गाडीतील बारी कुटुंबातील तीन महिला व दोन पुरुषांसह चालक गाडीतून खाली उतरले. त्यावेळी गाडीने पेट घेतला. काही कळण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले. प्रसंगावधान राखून महामार्गावरून निघालेल्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव यांनी आपली गाडी घटनास्थळी थांबवली. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलासह देखभाल विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर देखभाल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधवसह महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, सुधाकर लोंढे, योगेश पवार, सचिन जाधव, अजय भोसले, मिथून शिंदे, राजू जाधव यांनी महामार्गावरील वाहतूक थांबवून अग्निशामक दलाच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविली. (प्रतिनिधी)