शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

पुतळा जाळला.. आज म्हणे आग ओकणार!

By admin | Updated: April 1, 2015 00:03 IST

राजघराण्यांतील संघर्ष चिघळला : समर्थकांची रस्त्यावर ‘लाखोली’; उदयनराजेंची बुधवारी पत्रकार परिषद

सातारा : सातारा आणि फलटणच्या राजघराण्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष थेट रस्त्यावर आला असून, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळताना उदयनराजे समर्थकांनी मंगळवारी अत्यंत अर्वाच्य भाषेचा वापर केला. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले बुधवारी पत्रकार परिषद घेणार असून, रामराजेंच्या वक्तव्यावरून ते यावेळी आग ओकतील, अशीच अटकळ बांधली जात आहे. नीरा-देवघरचे पाणी बारामतीकडे वळविण्याच्या निर्णयावरून नाराज असणाऱ्या घटकांना उदयनराजेंनी एकत्रित आणून रामराजेंवर टीका केल्यानंतर या दोन नेत्यांत संघर्षाची ठिणगी पडली. विधान परिषदेचे सभापतिपद रामराजेंना मिळणे जवळपास निश्चित झाल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले आणि त्याच वेळी उदयनराजे फलटणमध्ये पोहोचले. रामराजेंच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. शब्दशस्त्रांची धार वाढत गेली आणि राजघराण्याचाच अवमान होऊ लागला. त्यामुळे नेत्यांच्या समर्थकांनी हा संघर्ष आता रस्त्यावर आणला आहे.मंगळवारी उदयनराजेंच्या समर्थकांनी रामराजेंचा निषेध करण्यासाठी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचे ठरविले. सकाळपासूनच या आंदोलनाच्या हालचाली सुरू होत्या. पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांनी पोवई नाक्यावर एक पोलीस व्हॅन तैनात केली. दुपारी दोननंतर मात्र बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली. जलद कृतिदलाचे जवानही नाक्यावर तैनात करण्यात आले. याखेरीज पालिकेच्या अग्निशमन दलास सूचना देऊन बंब मागवून घेण्यात आला.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला कार्यकर्ते जमा होण्यास अडीचपासूनच सुरुवात झाली. तीन वाजेपर्यंत कार्यकर्त्यांची संख्या बरीच वाढली. कडेकोट बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याचे दहन करणे अवघड होते. साडेतीनच्या सुमारास हा जमाव घोषणा देत सिग्नलच्या दिशेने निघाला. त्यांच्या बरोबर पोलीसही त्या दिशेने निघाले. अत्यंत अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या जात होत्या. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी जमावाला सिग्नलजवळ रोखून धरले. तथापि, या जमावावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असतानाच अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कार्यकर्त्याने पुतळा पेटविला. दुसरा गट त्या ठिकाणी घोषणा देऊ लागला आणि सिग्नलजवळचा गटही त्या दिशेने धावला. पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. पोलीस चालून येत असल्याचे पाहून कार्यकर्ते पळू लागले आणि त्याही रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी पेटता पुतळा विझवून ताब्यात घेतला आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. ताब्यात घेतलेले कार्यकर्ते पोलीस व्हॅनमधूनही शिवराळ भाषेत गोंधळ करीत होते. माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोरही कार्यकर्त्यांनी अत्यंत अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. अकरा जणांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन निघून गेल्यावरही सव्वाचारपर्यंत अनेक कार्यकर्ते पोवई नाका परिसरात होते. आंदोलनात सादिकभाई शेख, अशोक शेडगे, विजय चौगुले, नाना शिंदे, राजकुमार पाटील, विनायक गोरे, नासीर शेख, विजय बडेकर, सागर राजेमहाडिक, नाना भोसले आदींनी भाग घेतला. दरम्यान, बुधवारी पत्रकार परिषदेत उदयनराजे काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)अकरा जणांना घेतले ताब्यातआंदोलनात सहभागी झालेल्या अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात राहुल शिवाजी पाटोळे (३५, रा. विलासपूर), नासीर बशीर शेख (४२, दुर्गा पेठ), समीर विजय निकम (३२, रा. शाहूनगर), संतोष वसंतराव जाधव (४३, रा. माची पेठ), प्रीतम चंद्रकांत कळसकर (२४, रा. मल्हार पेठ), रमेश कुंडलिक निंबाळकर (२४, रा. मंगळवार पेठ), गणेश अरुण जाधव (२९, रा. केसरकर पेठ), प्रशांत प्रभाकर पटवर्धन (३५, रा. व्यंकटपुरा पेठ), सागर सुरेश साळुंखे (४०, रा. केसरकर पेठ), अजिंक्य मंगेशराव मोहिते (२६, रा. शाहूपुरी), तानाजी मुरलीधर बडेकर (३६, रा. रविवार पेठ) यांचा समावेश आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या ११ जणांना जामिनावर मुक्त करण्यात आले.अकरा जणांना घेतले ताब्यातआंदोलनात सहभागी झालेल्या अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात राहुल शिवाजी पाटोळे (३५, रा. विलासपूर), नासीर बशीर शेख (४२, दुर्गा पेठ), समीर विजय निकम (३२, रा. शाहूनगर), संतोष वसंतराव जाधव (४३, रा. माची पेठ), प्रीतम चंद्रकांत कळसकर (२४, रा. मल्हार पेठ), रमेश कुंडलिक निंबाळकर (२४, रा. मंगळवार पेठ), गणेश अरुण जाधव (२९, रा. केसरकर पेठ), प्रशांत प्रभाकर पटवर्धन (३५, रा. व्यंकटपुरा पेठ), सागर सुरेश साळुंखे (४०, रा. केसरकर पेठ), अजिंक्य मंगेशराव मोहिते (२६, रा. शाहूपुरी), तानाजी मुरलीधर बडेकर (३६, रा. रविवार पेठ) यांचा समावेश आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, या ११ जणांना जामिनावर मुक्त करण्यात आले.