शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला बांधून जावयाचा खून

By admin | Updated: March 11, 2017 21:45 IST

पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या जावयाचा झाडाला बांधून मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना लिंब, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली

आॅनलाईन लोकमतसातारा,  दि. 11 : पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या जावयाचा झाडाला बांधून मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना लिंब, ता. सातारा येथे शुक्रवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी सासू, सासरा आणि मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.महादेव बापू पवार (वय २८, रा. मतकर कॉलनी, सातारा) असे खून झालेल्या जावयाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महादेव पवार याची पत्नी काही महिन्यांपासून त्याच्यासोबत राहात नव्हती. त्यामुळे पत्नीला आणण्यासाठी तो लिंब येथे गेला होता. ह्यपत्नीला माझ्यासोबत पाठवा,ह्ण असे त्याने सासऱ्याला सांगितले. मात्र, त्यांनी आपल्या मुलीला पाठविण्यास नकार दिला. याचा राग त्याला आल्याने त्याने सासरे हरी राठोड यांच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. त्यामुळे संतप्त होऊन मेहुणा सुनील आणि सासू शारदा तसेच सासरा शंकर यांनी जावई महादेवला बेदम मारहाण केली. त्यानंतर लिंब येथील खडवी नावाच्या शिवारातील एका झाडाला त्याला बांधण्यात आले. त्याला तेथेच सोडून सर्वजण घरी आले. हरी राठोड यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. उपचार घेतल्यानंतर ते परत घटनास्थळी गेले. त्यावेळी जावयाचे मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. त्यानंतर महादेवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.महादेव पवार यांचा भाऊ शंकर पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सासू, सासरा आणि मेहुण्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मेहुणा सुनील याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)राठोड कुटुंबीय विहिरीचे खोदकाम मजूर म्हणून काम करतात. या घटनेपूर्वी राठोड कुटुंबीय लिंब येथे एका विहिरीचे खोदकाम करत होते. त्याच ठिकाणी हा प्रकार घडला असल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.