शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:29 IST

वडूज : चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने चार अल्पवयीन युवकांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील एका गावात घडली. संबंधित युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना संतप्त जमावाने रविवारी तिघा आरोपींना मारहाण केली. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईचा ...

वडूज : चौदा वर्षीय शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस जबरदस्तीने चार अल्पवयीन युवकांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील एका गावात घडली. संबंधित युवकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना संतप्त जमावाने रविवारी तिघा आरोपींना मारहाण केली. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीच्या आईचा पुतण्या हा शनिवारी (दि. १३) घरी आला व त्याने सांगितले की, ‘गावातील काही मुले दीदीच्या पाठीमागे असतात व ते घराकडे येत असतात. तुम्ही दीदीकडे विचारपूस करा.’ त्यानंतर आई-वडिलांनी विचारपूस केली असता पीडित मुलीने रडत आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पंधरा दिवसांपूर्वी गावातील चार युवक माझ्या पाठीमागे लागून त्रास देत होते. रविवार, दि. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पीडित मुलगी एकटी घरी असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संबंधित चौघे घरात आले. त्यावेळी आई शेतात तर वडील सातारा येथे कामानिमित्त गेले होते. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणून त्या युवकाने घरात जबरदस्तीने अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याचा एक मित्र आला. त्यानेही चाकूचा धाक दाखवून अतिप्रसंग केला. थोड्यावेळाने तेथून तो निघून गेला. त्यानंतर दुसºया दिवशी दि. १ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता घरात कोणी नसताना चौघे युवक पुन्हा घरी आले. त्यातील एकाने पुन्हा अतिप्रसंग केला आणि घरातून बाहेर गेला. लगेच त्याचा एक मित्र घरात येऊन जबरदस्तीने पुन्हा त्याने अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित मुलगी रडत असताना त्याचा आणखी एक मित्र घरात आला व त्यानेही जबरदस्तीने अतिप्रसंग केला. पुन्हा सर्वजण घरात येऊन झालेल्या प्रकाराबाबत ‘कोणाला सांगितलं तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देऊन निघून गेले. दरम्यान, तीनही संशयितांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी सात वाजता ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना पोलिसांसमक्ष मारहाण केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून जमावाच्या तावडीतून त्यांची सुटका केली. रात्री उशिरा पोलिसांनी आणखी एकास ताब्यात घेतले.जलद कृती दल तैनातसामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे खटाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, संतप्त जमाव आक्रमक झाला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे स्वत: घटनास्थळी दाखल झाले. तसेच जलद कृती दलालाही तैनात केले आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.