शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा !

By admin | Updated: December 20, 2015 00:39 IST

व्याघ्र प्रकल्प : ‘सह्याद्री’मधील विस्थापितांची प्रक्रिया तांत्रिक अडचणीत

राजीव मुळ्ये / सातारा विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जमिनींची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने, त्याचा लाभ बिल्डर लॉबी उचलण्याचा धोका असतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विस्थापितांच्या बाबतीत हा धोका समोर उभा असून, तांत्रिक त्रुटी दूर होण्याची तातडीची गरज आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील सात गावांचे पुनर्वसन भिवंडीजवळील एकसाल आणि सागाव या गावांच्या जवळ होत आहे. पुनर्वसनासाठीच्या जमिनीवर ‘नवीन शर्त’ हा शिक्का मारण्याचा नियम असून, हा शिक्का असलेली जमीन परवानगीशिवाय विकता येत नाही. ‘सह्याद्री’तील सात गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होऊनही, हा शिक्का पुनर्वसनातील जमिनींवर अद्याप पडलेला नाही. ही प्रक्रिया महसूल अथवा पुनर्वसन खात्यामार्फतच पूर्ण होऊ शकते. मात्र, ‘सह्याद्री’तील विस्थापितांचे पुनर्वसन वन विभागाच्याच जमिनीवर होत आहे आणि या खात्याला आपल्या जमिनीवर ‘नवीन शर्त’ हा शिक्का मारण्याचा अधिकारच नाही, अशी तांत्रिक अडचण आहे. ‘सह्याद्री’तील पुनर्वसितांना मिळत असलेली जमीन वनखात्याची असल्यामुळे बिल्डर लॉबीला मिळविता आलेली नाही. तथापि, जमिनीचे उतारे पुनर्वसितांच्या नावे होताच, बिल्डर लॉबीकडून त्यांना आमिषे दाखविली जाऊ शकतात. ‘सह्याद्री’च्या कोअर झोनमधील कुसापूर, रवदी, आडोशी, माडोशी, तांबी, खिरखिंडी आणि वासोटा या गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असून, ती मार्चअखेर पूर्ण करण्याचा चंग वनखात्याने बांधला आहे. तोडगा शक्य, पण तातडी हवी - तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठीचा तोडगा शक्य आहे, अशी माहिती पुनर्वसन खात्यातील सूत्रांकडून मिळाली. पुनर्वसित जमिनींची ‘वर्ग एक’ आणि ‘वर्ग दोन’ अशी वर्गवारी केली जाते. ‘वर्ग दोन’मधील जमिनी पुनर्वसन खात्याच्या परवानगीखेरीज विकता येत नाहीत. मात्र, हे खाते वनखात्याच्या जमिनीबाबत स्वत: निर्णय घेऊ शकत नाही. विस्थापितांना मिळालेले लाभ - भूमिहीन व्यक्तीला एक एकर जमीन - इतरांना बाधित क्षेत्राच्या प्रमाणात जमिनी - एक हेक्टरपेक्षा कमी जमीन कोणालाच नाही - घरासाठी ३७० चौरस मीटरचा निवासी भूखंड - घरबांधणीसाठी प्रत्येकी १ लाख ६१ हजार रुपये - स्थलांतर खर्चासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये