शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’

By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST

साताऱ्यात म्हशींची झुंबड : हॉर्नचा आवाजही निष्प्रभ

सातारा : साताऱ्यातील प्रमुख मार्गापैकी राजपथावर वाहने चालविणे खूप जिकरीचे बनले आहे. जागोजागी खड्डे, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमण यातून वाट काढता-काढता वाहनधारकांची दमछाक होते. त्यातच सायंकाळी दिवे लागताच म्हशींचा कळप राजपथावरून दररोज जातो. या म्हशींना हटकविण्यासाठी हॉर्न वाजविला तरी कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही. त्यामुळे झगमगत्या राजपथावर ‘बफेलो वॉक’ची वेळ झाली असेच बोलले जात आहे.पोलीस करमणूकपासून कमानी हौदापर्यंत दररोज सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान जवळपास दहा ते पंधरा म्हशींचा कळप निघतो. दिवसभर चरण्यासाठी सोडलेली ही जनावरे सायंकाळी पुन्हा आपल्या गोठ्याकडे परतात. त्यांचा हा रोजचाच दिनक्रम आहे. राजपथावर नेहमी सायंकाळी सहानंतर वाहतुकीची वर्दळ असते. हजारो वाहने या मार्गाचा दररोज वापर करतात. त्यामुळे या मार्गावर रस्ता ओलांडतानाही पादचाऱ्यांना मुश्किल बनले आहे. तर दुसरीकडे याच मार्गावर काही वाहनधारक बेधडकपणे सुसाट वाहने चालवितात. त्यांच्या वेगालाही मर्यादा राहात नाही. त्यामुळे राजपथावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झाला आहे; पण याच वाहनांना या म्हशींचा अडथळा निर्माण झाला आहे.राजपथावरील दिवा बत्ती लागल्यानंतर दररोज या म्हशी कमानी हौदाजवळील गोठ्याकडे निघतात. गाड्यांचा आवाज अन् ऐटीत जाणाऱ्या म्हशी याकडे पाहून अनेकजन आश्चर्याने बघतात. ज्या मार्गावर पादचाऱ्यांना वाहनधारक जुमानत नाही तेच वाहनधारक पोलीस करमणूक केंद्रापासून कमानी हौदापर्यंत या म्हशींच्या मागे हॉर्न वाजवित वाहने चालवीतात. म्हशीही काळ्या कूट असल्याने अनेकवेळा वाहने जवळ आल्यावर म्हशी दिसतात व कचकन ब्रेक लावतात. दरम्यान, कितीही हॉर्न वाजवा किंवा वाहने आडवी मारा आम्हाला त्याच काय, आम्ही फक्त आमचे घर गाठायचे, अशी खूणगाठच म्हशींनी या राजपथावरून जाताना जणू मारली आहे, असेच म्हणावेलागेल. (प्रतिनिधी)