शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएफ’ला हवी ‘वन रँक वन पेन्शन’

By admin | Updated: September 15, 2015 23:55 IST

साताऱ्यात मोर्चा : लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती लागू करण्याची मागणी

सातारा : ‘वन रँक वन पेन्शन’च्या निर्णयाचा लाभ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) निवृत्त जवानांना मिळावा, या आणि इतर मागण्यांसाठी निवृत्त जवानांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. लष्कराप्रमाणेच सर्व सेवाशर्ती ‘बीएसएफ’ला लागू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सेवा व पेन्शनचे सर्व नियम भारतीय स्थलसेनेप्रमाणे लागू करावेत, ‘वन रँक वन पेन्शन’ योजना लागू करावी, जवानांना मोफत आरोग्य सुविधा पुरवाव्यात, लष्कराप्रमाणे माजी सैनिकाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, प्रत्येक जिल्ह्यात ‘बीएसएफ’ माजी सैनिक कल्याण मंडळ स्थापन करावे आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्यावेत, ही मंडळे वैधानिक संस्था म्हणून अस्तित्वात आणावीत, स्थलसेनेप्रमाणेच ‘बीएसएफ’ जवानांसाठी स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था करावी, ‘बीएसएफ अ‍ॅक्ट’च्या कलम १९ प्रमाणे दहा वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या जवानांचे थांबविलेले निवृत्तिवेतन पुन्हा सुरू करावे, कॉन्ट्रिब्यूटरी पेन्शन प्रथेतून ‘बीएसएफ’ जवानांना सूट मिळावी, शहिदाच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची नोकरी मिळावी, मुलांना प्रत्येक स्तरावर मोफत शिक्षण मिळावे, ‘बीएसएफ’ जवानाच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त अपंग व वृद्ध जवानांना उद्योगधंद्यांसाठी अर्थसाह्य मिळावे, निवृत्त जवानांना शेतजमीव व घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी) सरकारकडून न्याय मिळावा... ‘बीएसएफ’ जवान या सर्व सुविधा मिळण्यास पात्र असून, सरकारने न मागताच त्या देणे गरजेचे होते. अशा सुविधा मिळत नसतील, तर यापुढे ‘बीएसएफ’मध्ये जाण्यास कोणीही धजावणार नाही. ‘बीएसएफ’ जवान शहीद झाल्यावर त्याला मानवंदना दिली जाते; मात्र नंतर त्याच्या पत्नीला सरकारदफ्तरी हेलपाटे मारावे लागतात. सीमा सुरक्षा दल नसते तर सीमेवरील तस्करी, भ्रष्टाचार, दहशतवादी हल्ले, बेकायदा कृत्ये कितीतरी वाढली असती. अशा जवानांना सरकारकडून न्याय मिळावा आणि त्यासाठी आंंदोलने, मोर्चा, सत्याग्रह असे मार्ग वापरावे लागू नयेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.