शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

भाऊ-दादा... कमळ बघ!

By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST

पक्षांतराची लाट : दिग्गज पक्षप्रवेशासाठी आसुसलेले; पंकजा मुंडेंच्या तारखेअभावी येळगावकरांचा प्रवेश रखडला

सातारा : जिल्ह्यातील अनेक नेत्यांना आता भाजपचे ‘कमळ’ खुणावू लागले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी घेतलेल्या विनोद तावडे यांनी पहिल्याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे आणि राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्या हाती कमळ देऊन राष्ट्रवादीला झटका दिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अन्य काही नेतेही भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत असलेतरी त्याविषयी भाजपकडून गुप्तता पाळली आहे. भाजपवासी होण्यास निघालेल्या माजी आमदार दिलीप येळगावकर यांना अजूनही पक्षप्रवेशासाठी मुहूर्त मिळालेला नाही. निश्चित झालेला कार्यक्रम रद्द करत त्यांनी ‘माझा प्रवेश खटावमध्ये नको; माणमध्ये घ्या,’ असे कारण पुढे करत भाजपच्या काही नेत्यांना कोड्यात टाकले. मात्र, त्यांना प्रवेशाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे-पालवेच हव्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दीड महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले येळगावकर भाजपवासी होणार आहेत. मात्र, त्यांची प्रवेशाची गाडी काही केल्या पुढे जायला तयार नाही. सोमवारी, दि. ११ रोजी त्यांचा खटाव येथे प्रवेश होणार होता. मात्र, स्वत: येळगावकरांनी माझ्या प्रवेशाचा कार्यक्रम कोरेगाव मतदारसंघात असलेल्या खटाव येथे नको, अशी भूमिका ठेवली. अर्थातच यापाठीमागे राजकीय कारणे आहेत. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची उपस्थिती असायला हवी, यासाठी त्यांनी पक्षाच्या राज्यपातळीवरील नेत्यांकडे आणि पंकजा यांच्याकडे विनंती केली आहे. मात्र, त्या मागणीला अजूनही सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचीही चर्चा आता माण विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर रंगली आहे.सातारा दौऱ्यावर असताना येळगावकर त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांच्या गराड्यातच भेटायला येतील, अशी शक्यता असल्यामुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. मात्र, ते कधी आले आणि कधी गेले हेच कोणाला समजले नाही. दरम्यान, तावडेंच्या पत्रकार परिषदेत येळगावकर यांच्या अनुषंगाने छेडले असता त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, हे विशेष !. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची जबाबदारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी कामही सुरू केले आहे. (प्रतिनिधी)माण अन् कोरेगाव कुणाकडे ?गत निवडणुकीत माण विधानसभा मतदारसंघ भाजपकडे होता. यावेळी दिलीपराव येळगावकर येथून पराभूत झाले. मात्र, आजमितीस महायुतीच्या माध्यमातून हा मतदारसंघ कोणाकडे जाईल, याविषयी कोणीही छातीठोकपणे बोलायला तयार नाही. ‘रासप’चे येथे केडर आहे. ‘स्वाभिमानी’ने लोकसभेला आपली ताकद दाखवून दिली. शिवसेनाही भक्कम आहे. ही सर्व मंडळी महायुतीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळेलच याची शाश्वती नाही. त्यातच खटावच्या महेश शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर अप्रत्यक्षरित्या दावा केला आहे. कोरेगाव गतवेळी शिवसेनेकडे होता. यावेळी जर कोरेगव भाजपकडे गेला तर माण भाजप, स्वाभिमानी, रासप की शिवसेना यांच्याकडे जाणार याविषयी काहीएक सांगता येत नाही. जरी येळगावकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मतदारसंघ इतरांकडे गेला तर काय..? असा मुद्दा उपस्थित होतोय.

 

सर्किट हाऊसबाहेर फेऱ्या...विनोद तावडे यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवांद साधला आणि पुढील कार्यक्रमाला गेले. यानंतर राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी चारचाकीतून बाहेरुन फेऱ्या मारत होता. कऱ्हाड तालुक्यातील हे महाशय आता भाजपवासी होण्यासाठी निघाले आहेत. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांचा त्यांना विरोध असल्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे. पक्षप्रवेश त्यांच्यासाठी निमित्त असले तरी त्यांच्या मनातील खदखद ही राष्ट्रवादीच्या नेत्यांबाबतीत आहे. ती खदखद व्यक्त करण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश हवा आहे. त्यांना बाकी काही नको आहे म्हणे. दरम्यान, जावळी विकास आघाडीच्या माध्यमातून सातारामधून शड्डू ठोकलेल्या जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनीही तावडे यांची भेट घेतली.