शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पॉइंटना मिळाली झळाळी

By admin | Updated: December 25, 2015 23:41 IST

महाबळेश्वर : वनविभागाकडून आॅर्थरसिट, एल्फिस्टन पॉइंटवर रंगरंगोटी

महाबळेश्वर : पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र असणाऱ्या महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉइंटना आता झळाळी मिळाली आहे. वन विभागाच्या क्षेत्र महाबळेश्वर वन व्यवस्थापन समितीने आर्थरसिट, एल्फिस्टन पॉइंटची साफसफाई व रंगरंगोटी केली असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘नंदनवन’ सज्ज झाले आहे.महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन असून, वर्षानुवर्षे महाबळेश्वरकडे पर्यटकांचा ओघ वाढतच आहे. येथील निसर्ग, वातावरण, हवा पर्यटकांना साद घालत असते. आजदेखील अनेकांच्या घरांतील तिसऱ्या तर अनेकांच्या चौथ्या पिढ्या महाबळेश्वरला नियमित येत असतात. जुन्या आठवणी जागविण्यासाठी काहीजण त्या पॉइंटला पुन्हा-पुन्हा भेट देण्यासाठी आवर्जून येतात. काही पर्यटक तर संपूर्ण कुटुंबासह नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी येथे येतात. यापैकी जवळपास ९० टक्के पर्यटक क्षेत्र महाबळेश्वर, एल्फिस्टन पॉइंट व आर्थरसिटकडे हमखास फिरायला जातातच. सर्व पर्यटकांची पहिली पसंती या परिसरालाच असते. याच गोष्टीचे भान ठेवून वन विभागाचे वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र महाबळेश्वर वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ लांगी, सचिव एल. डी. राऊत यांच्यासह समितीच्या सर्व सभासदांनी या परिसरातील पॉइंट स्वच्छ केले. पर्यटकांना केवळ निसर्गाची भुरळ न पडता येथील स्वच्छ व सुंदर परिसरामुळे येथील पॉइंटची देखील भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. या परिसरातील डांबरी रस्त्यांची देखील डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक व पर्यटकांना स्वच्छ प्रसन्नतेची खऱ्या अर्थाने अनुभूती येईल. (प्रतिनिधी)