शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीच्या शुभ्र प्रकाशानं उजळला अवघा सातारा!

By admin | Updated: April 17, 2016 00:33 IST

दीड हजार दिवे बसविले : दुसऱ्या टप्प्यांत अंतर्गत पेठांमध्ये दिवे बसविणार

सातारा : सातारा पालिकेने एलईडी सिटी होण्याचा पहिला मान मिळविला असून, निम्मे शहर आता एलईडीच्या झगमगाटात बुडून गेले आहे. अजिंक्यतारा व यवतेश्वरवरून सातारा शहराचे दृश्य रात्री पाहण्यासारखे आहे. एलईडी सिटीमुळे शहराने डायमंड नेकलेस घातल्याचे दिसत आहे. सातारा पालिकेने एलएईडी सिटी होण्याचा पहिला मान मिळविला आहे. ‘लोकमत’ने सातारा सिटी ही एलएईडी सिटी होणार असल्याचे सगळ्यात आधी वृत्त दिले होते. त्यानंतर काही दिवसांतच शहरामध्ये एलएईडी दिवे बसविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर पालिकेने एलएईडी दिव्यांची चाचणी घेतली. त्यानंतर जवळपास संपूर्ण शहरामध्ये एलएईडी दिवे लावण्यास सुरुवात झाली. पोवई नाका ते नगरपालिकेपासून राजवाड्यापर्यंत आणि मोती चौक ते पोलिस मुख्यालयापर्यंत एलएईडी दिवे सध्या लावण्यात आले आहेत. सुमारे दीड हजार एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी दिवे लावण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये बुधवार नाका, करंजे तर्फे ते शाहू स्टेडियमपासून पोवई नाक्यापर्यंत एलएईडी दिवे लावण्यात येणार आहेत. या एलएईडी दिव्यांमुळे पालिकेची विजेची बचत होणार असून, महिन्याकाठी तब्बल सात लाख रुपये खर्च बचत होणार आहे. या एलईडी दिव्यांमुळे शहर उजळून निघाले असून, रस्त्यावर पडलेली टाचणीही दिसेल, इतका पांढरा शुभ्र प्रकाशझोत एलएईडी दिव्यांचा पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. यवतेश्वर व अजिंक्यताऱ्याहून सातारा शहर एलएईडी दिव्यांमुळे झगमगाट दिसत आहे. पूर्वीचे दिवे पिवसळ होते. त्यामुळे रात्रीचे स्पष्ट दिसत नव्हते. शिवाय वीज बिलही सुमारे १४ लाख रुपये येत होते. परंतु आता एलएईडी दिव्यांमुळे पालिकेचे निम्मे सात लाख रुपये वाचणार आहेत. हे पैसे आता इतर विकास कामांसाठी पालिकेला वापरता येणार आहेत. (प्रतिनिधी)