शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंज-मालदेववाडी रस्त्यावरील पुलाला पुन्हा भगदाड

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

ग्रामस्थांतून संताप : तात्पुरती मलमपट्टी ठरली कुचकामी

भुर्इंज : येथील भुर्इंज मालदेववाडी असलेल्या रस्त्यावरील पुलाला मध्यभागीच भगदाड पडले असून, पुलाच्या दर्जाचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पुलाला अशाच प्रकारचे भलेमोठे भगदाड पडले होते; मात्र संबंधितांनी फक्त मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली. ती गळून पडली असून, या सर्व प्रकाराबाबत परिसरात संताप व्यक्त होत आहे. भुर्इंज मालदेववाडी या रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यावरील या पुलावरून सतत वर्दळ सुरू असते. सुमारे २५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीवेळी या पुलाला भलेमोठे भगदाड पडले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुरुमाची मलमपट्टी करून तेव्हा पडलेले भगदाड मुजवण्यात आले; मात्र अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा या पुलावरच भलेमोठे भगदाड पडल्याने पूल किती दिवस तग धरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच पुलाच्या दर्जाचे अवघ्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा धिंडवडे निघाले आहेत. असे असतानाही महाडनजीकच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेवरून प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या ओढ्याला पाणीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जनतेच्या मनात धास्ती आहे. मुळातच या भगदाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून, तसे काही झाल्यानंतरच संबंधित विभागाला जाग येणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींकडे प्रशासनाचे पुरेशा गांभीर्याने नसलेले लक्ष जनतेचा रोष वाढवत आहे. रात्रीच्या वेळी जर काही घडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता असून, या पुलाची केवळ मलमपट्टी न करता मजबूत दुरुस्ती करावी, अशी मागणी आबासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे, सुनील शिंदे, वैभव शिंदे, चंद्रकांत जाधवराव, अंकुश मोरे, श्रीपाद एरंडे यांनी केली आहे. धोम परिसरातील दोन पूल वाहून जाऊन अनेक महिने होऊनही प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्याने त्या परिसरातील पन्नासहून अधिक मुलांना घरी बसून काढावे लागत आहे. त्यातच या पुलाला भगदाड पडल्याने संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)