शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात वाढीव घरपट्टीच्या नोटिसांना ब्रेक

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

बंद यशस्वी : पैसे न भरता अपील करण्यास नागरिकांना मुख्याधिकाऱ्यांकडून परवानगी

इस्लामपूर : महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा भंग करीत ७० ते ८० टक्के वाढीव दराने धाडलेल्या नोटिसांवर ५० टक्के रक्कम भरुन अपील करण्याऐवजी आता एक दमडीही न भरता अपील करण्याची मुभा नागरिकांना मिळवून देण्यात मूठभर विरोधक यशस्वी ठरले. या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांवरून त्यांनी पुकारलेल्या ‘इस्लामपूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाविरुध्दचा रोष प्रकट केला.भाजपच्या प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रम पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार व सहकाऱ्यांनी अन्यायकारक घरपट्टी नोटिसांवरून आज इस्लामपूर ‘बंद’ची हाक दिली होती. आज सकाळपासून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार सायंकाळपर्यंत बंद ठेवून शहरवासीयांनी हा बंद यशस्वी केला.सायंकाळी विक्रम पाटील व शिष्टमंडळाने मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांना निवेदन दिले. त्यामध्ये नगरपालिका अधिनियमातील कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी न करता घरपट्टीच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. याबाबतची नोटीस २७ फेबु्रवारीला प्रसिध्द करताना त्यामध्ये ३० दिवसांच्या आत आक्षेप, हरकती नोंदवण्याचे आवाहन केले होते; मात्र हे आक्षेप विनामूल्य दाखल करुन घेणे आवश्यक असताना पालिकेककडून काहींचे ५0 टक्के रक्कम भरुन घेऊन, तर काहींचे विनामूल्य आक्षेप स्वीकारण्याचा भोंगळ कारभार सुरू होता, असे नमूद केले आहे. पाटील म्हणाले, पालिकेने नागरिकांना मोठ्या वाढीव दराने घरपट्टीच्या नोटिसा दिल्याने बंदची हाक द्यावी लागली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विनामूल्य अपिलाची मागणी मान्य न केल्यामुळे हे आंदोलन करणे भाग पडले. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरलो. आता यापुढे घरपट्टी ७० टक्के कमी करण्यास प्रशासन व सत्ताधाऱ्यांना भाग पाडू.यावेळी मोहन वळसे, गणेश राऊत, अशोक पाटील, रफिक तांबोळी, प्रकाश कोठारी, शिवाजी पाटील, सिकंदर पटेल, योगेश गोंदकर, समीर आगा, रियाज डाके, प्रकाश माने, सुधीर कुलकर्णी, आसिफ बारस्कर, सचिन कचरे, माणिक खांबे, सर्फराज डाके, राजेंद्र दळवी, गजानन फल्ले, माणिक ढोबळे, रशीद इबुशे, विकास पाटील, अय्याज पटेल उपस्थित होते. (वार्ताहर)‘ई-टेंडर’मध्येही गैरव्यवहारतसेच पुणे येथील स्थापत्य कन्सल्टंट कंपनीने ७0 लाख रुपये घेऊन केलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणात अनेक त्रुटी आहेत. या ‘ई-टेंडर’ प्रकारातही गैरव्यवहार झाला आहे का? याची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुख्याधिकारी देशमुख यांनी, उद्यापासून ज्या नागरिकांना हरकती, आक्षेप दाखल करावयाचे आहेत त्यांना विनामूल्य अपील दाखल करता येईल, असे मान्य केल्याची माहिती विक्रम पाटील यांनी दिली.