शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कॉपीराईट कायद्याचा भंग; केबलमालकावर गुन्हा

By admin | Updated: January 8, 2016 01:13 IST

इ.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व शिरवळ पोलिसांनी आझाद केबलच्या कार्यालयावर छापा टाकला

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील आझाद केबल नेटवर्कवर अनधिकृतपणे स्टार चॅनेलचे प्रक्षेपण दाखवित कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी केबलमालकावर शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद गफूर खान (रा. शिरवळ, ता. खंडाळा ) असे गुन्हा दाखल झालेल्या केबलमालकाचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी ९५ हजार रुपयांचा केबल मशिनचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ येथील आझाद केबल नेटवर्कचे मालक जावेद गफूर खान यांच्याशी स्टार कंपनीचा करार ३१ जून २०१५ रोजी संपला होता. कंपनीने जावेद खान यांना नवीन करार करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र जावेद खान यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे स्टार कंपनीने आझाद केबल नेटवर्कला दिलेले वितरणाचे हक्क खंडित केले. दरम्यान, भोर येथील केबलचालकाकडून स्टार चॅनेलचे आझाद केबल नेटवर्कवर जावेद खान हे अनधिकृतपणे वितरण करीत असल्याची माहिती मुंबई येथील स्टार कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार कंपनीच्या ई.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सातारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानुसार इ.आय.पी.आर. इंडियाच्या अधिकाऱ्यांनी व शिरवळ पोलिसांनी आझाद केबलच्या कार्यालयावर छापा टाकला. यावेळी स्टार चॅनेलचे अनधिकृतपणे प्रक्षेपण सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ठिकाणी असणारी प्रक्षेपणाची ७५ हजार रुपये किमतीचे तीन ट्रान्समीटर, १० हजार रुपये किमतीचे रिसिव्हर, ५ हजार रुपये किमतीचा डीव्हीडी प्लेअर व ५ हजार रुपये किमतीचे आॅप्टिकल नोड असा ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवालदार संतोष मठपती हे करीत आहे. (प्रतिनिधी)सल्लागाराचा हप्ता चालू करण्याचा सल्लाशिरवळ पोलीस ठाण्यात केबलचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असताना कंपनीचा कायदेशीर सल्लागार असणाऱ्या व मुंबई येथील निवृत्त पोलीस निरीक्षक टोपकर नाव असणारा एक जण पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या नावाने दमबाजी करण्यात मश्गुल होता. केबलचालकाला पाहून जोरदार हसत सल्लागार केबलचालकाला म्हणाले, ‘शिरवळ येथील पोलीस निरीक्षकाला तू भेटलेला दिसत नाहीस. येथेही हप्ता सुरू कर. तू जर कार्यालयात भेटला असतास तर ही कारवाई झालीच नसती, असे सांगत हप्ता सुरू करण्याचा अजब सल्ला दिला.