शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत असताना युवकांची ‘हिरो’गिरी..!

By admin | Updated: August 27, 2014 23:30 IST

कास परिसर : पर्यटकांची धटिंगगिरी; स्थानिकांना त्रास अन् मारहाणही

सातारा : कास पठार म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. पण, कास पठाराकडे जाताना अनेक पर्यटक हुल्लडबाजी करीत असतात. अनेकवेळा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून स्थानिक नागरिकांना मारहाणीचाही प्रकार होत आहे. काही युवक तर गर्लफ्रेंडबरोबर येतात. रस्त्याच्या बाजूला बसूनच त्यांच्याकडून अश्लील चाळे सुरू असतात. अशा वेळी त्यांना हटकल्यावर त्यांच्यात ‘हिरो’गिरी संचारते. यामुळे स्थानिकांनी अशा प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हुल्लडबाजांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांच्याकडून होऊ लागली आहे. कास पठार हे साताऱ्यापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. कास पठार तसेच बामणोलीकडे सातारा जिल्ह्याबरोबरच राज्य तसेच पराराज्यांतूनही पर्यटक येत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असून हजारो पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. सुटीच्या दिवशी तर हजारो पर्यटक येत असतात. हे पर्यटक कासकडे जाताना मध्येच अनेक ठिकाणी थांबतात. जागोजागी थांबून निसर्गाचे अनोखे रूप पाहतात. पण, त्यापैकी काहीं जणांकडून व विशेषत: करुन तरुणांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात. गावाच्या जवळ थांबून ओरडणे, रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, रस्त्याच्या कडेलाच अश्लील चाळे करणे असे प्रकार त्यांच्याकडून होत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक नागरिक त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. पण, समोरच्या युवकाकडून स्थानिक नागरिकांना अपमानित व्हावे लागते. काही वेळा तर बाका प्रसंग उद््भवतो. संबंधित युवक नागरिकांना मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. अशा घटना कास रस्त्यावर वारंवार घडू लागल्या आहेत. काही युवक-युवती रस्त्याच्या बाजूच्या झाडांखाली बसून अश्लील चाळे करतात. जनावरांच्या पाठीमागे गेलेल्या ग्रामस्थांच्या नजरेस असे प्रकार येतात. त्यामुळे ग्रामस्थांना आपली जनावरे तेथेच सोडून दूर निघून जावे लागते.अनेक वेळा शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या लहान मुलांच्या दृष्टीसही असे प्रकार पडतात. या प्रकारांमुळे सांस्कृतिक प्रदूषण वाढीस लागले असल्याने कासकडे जाणाऱ्या रस्त्यावर असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)