शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या धडकेत दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:39 IST

एकजण गंभीर : गोरे बंधूंनी जखमींना रुग्णालयात हलविले

वडूज : खटाव तालुक्यातील गोपूज येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. शंकर बिरू माने (वय ४५, रा. उपाळे-मायणी, ता. कडेगाव) व योगेश सदाशिव कदम (२३, रा. पुसेसावळी, ता. खटाव) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर माने हे उपाळे-मायणीहून पुसेसावळी मार्गे वडूज येथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १० बीएच ५५०५) वरून येत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोपूज शाळेसमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून आलेल्या दुचाकीची धडक बसली. या दुचाकीवर योगेश कदम व आकाश दादासाहेब कदमङ्कहे चुलत बंधू होते. त्यामध्ये शंकर माने व योगेश कदमङ्कगंभीर जखमी झाले. आमदार प्रभाकर घार्गे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी पळशी येथे जात असलेल्या आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस शेखर गोरे हे दोघे दोन वाहनांतून पळशीकडे जात असताना अपघातस्थळी थांबले. त्यांनी स्वत:च्या वाहनांतून जखमींना वडूजला उपचारासाठी आणल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शंकर माने यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर योगेश कदम यांना पुढील उपचारासाठी साताऱ्याला हलविण्यात आले. प्रवासातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी आकाश कदमङ्कयाच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश व आकाश कदमङ्कहे मुंबईहून दोनच दिवसांपूर्वी पुसेसावळीत चुलत भावाच्या लग्नासाठी आले होते. काही कामानिमित्त ते वडूजला आले होते. वडूजहून परतत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार बी. पी. खुस्पे तपास करीत आहेत.