शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बबलूच्या पुतण्यासह दोघांना अटक

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : बाबरला ठेचल्याची कबुली; घटनास्थळी बबलू-बाबरचा वाद

कऱ्हाड : बबलूचा गोळ्या झाडून खून केल्यानंतर बाबरला ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी बबलूच्या पुतण्यासह आणखी एकास अटक केली आहे. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, आणखी काहीजणांचा त्यामध्ये हात असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, बाबरने गोळ्या झाडण्यापूर्वी बबलूशी त्याचे बोलणे झाले होते. अवघ्या काही सेकंदाच्या त्या चर्चेवेळी बबलू व बाबरचा खटका उडाला. तसेच दोघांची झटापट झाली. त्यानंतर क्षणार्धात बाबरने स्वत:जवळील पिस्तूल काढून बबलूवर गोळ्या झाडल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलीस या साक्षीदारांकडून मिळत असलेल्या माहितीवरून तपासाची दिशा निश्चित करीत आहेत. बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बबलूचा पुतण्या सागर चंद्रकांत माने (वय २५) व हृषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर पालिकेकडील रस्त्यावरून बबलू असलेल्या ठिकाणी आला. त्यावेळी दोघेही समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर झटापट होऊन काही सेकंदाच्या आत बाबरने स्वत:जवळील पिस्तुलातून बबलूवर गोळ्या झाडल्या. यावेळी बबलूचा पुतण्या सागर त्याठिकाणी होता. बबलू व त्यानंतर त्याची आई अनुसया यांना गोळ्या घातल्यानंतर बाबर तेथून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावातील एकाने त्याला पाठीमागून पकडले. तसेच त्याच्याशी झटापट झाली. त्यावेळी बाबरच्या हातातील पिस्तूल खाली पडले. त्यानंतर जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात सिमेंटची पाईप घातली. तसेच दगडाने ठेचून त्याचा खून केला. या खून प्रकरणात सागर माने व हृषिकेश शेंदरे सहभागी असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांशिवाय अन्य काहीजण संशयित आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. बबलूच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काही संशयितांची नावेही निष्पन्न झाली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस त्या संशयितांचा शोध घेत आहेत. तसेच सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)बाबरची पिस्तूल नादुरुस्तबबलूवर दोन गोळ्या झाडल्यानंतर अनुसया यांनी बाबरला प्रतिकार केला. त्यावेळी बाबरने त्यांच्या दिशेनेही दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी अनुसया यांच्या पायाला लागली, तर दुसरीचा नेम चुकला. दोन जिवंत काडतुसे पोलिसांना घटनास्थळी मिळाले. सातवी गोळी बाबरच्या पिस्तुलातच अडकून पिस्तूल नादुरुस्त झाले, असे पोलिसांनी सांगितले. बबलू-बाबर संभाषण महत्त्वाचेघटनेवेळी बबलू आणि बाबर खान समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात संभाषण झाले होते. हे संभाषण म्हणजे वाद होता आणि या वादानंतर झटापटही झाली होती. हे सर्व काही सेकंदात झाले होते. मात्र, बबलू आणि बाबरमध्ये त्यावेळी जे संभाषण झाले, ते तपासाच्या दृष्टीने पोलिसांसाठी महत्त्वाचे आहे. त्यानुसारच सध्या पोलीस तपास सुरू आहे.