शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

मरणाच्या दारातून परतल्या दोघी!

By admin | Updated: May 3, 2015 00:53 IST

गीता अन् पूजा लागल्या चालू : ‘लोकमत’च्या हाकेला कण्हेरीच्या हॉस्पिटलने दिला हात

राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात गंभीरपणे भाजलेल्या व उपचारावाचून तडफडणाऱ्या गीता व पूजा या दोघींच्याही जीवाचा धोका आता टळला आहे. कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अफाट कष्टामुळे हे आश्चर्य घडले आहे. दोघींवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले असून, सर्व खर्च रुग्णालय ट्रस्टने स्वत:हून केला आहे. ओझर्डे येथील यात्रेत शोभेची दारू उडवताना झालेल्या स्फोटात गीता रामदास पवार (वय ५) आणि पूजा रामदास पवार (९) या दोन्ही चिमुरड्या अनुक्रमे ८२ व ६७ टक्केभाजल्या होत्या. या दोघींवर एक दिवस जिल्हा रुग्णालयात उपचार झाले. तेथून त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. मात्र, नातेवाइकांनी या मुलींना फलटण तालुक्यातील तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे अत्याधुनिक सुविधांची वानवा असल्याने उपचारांना मर्यादा होत्या. त्यामुळे तरडगाव येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर दोघींना पुन्हा साताऱ्यास नेण्यात सांगितले. गंभीर भाजलेल्या या चिमुरड्यांची त्याच अवस्थेत पुन्हा तरडगाव ते सातारा व साताऱ्यात पुन्हा पुण्याकडे बोट दाखविण्यात आल्याने सातारा ते तरडगाव अशी फरफट झाली. या दोघींची परिस्थितीच एवढी बिकट होती की, त्या वाचतील, असे कोणीच सांगत नव्हते. त्यामुळे या दोघींना तरडगावहून भिरडाचीवाडी, भुर्इंज येथील गोपाळवस्तीमध्ये पत्र्याच्या झोपडीत आणून ठेवण्यात आले. कोणत्याही उपचाराविना सलग चार दिवस या चिमुरड्या पाणी-पाणी म्हणत तडफडत होत्या. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच या दोघींवर उपचाराची कार्यवाही सुरू झाली. कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जेव्हा या दोघींना दाखल केले गेले, तेव्हा तब्बल दहा दिवस उलटून गेले होते. या दहा दिवसांच्या फरफटीत या दोघींचे प्राण अक्षरश: कंठाशी आले होते. मात्र, सिद्धगिरी हॉस्पिटलचे वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. रणजित गिरमे, जनरल सर्जन डॉ. लिमये आणि बालरोगतज्ञ डॉ. अमोल मोहिते व त्यांच्या टीमने दोघींवर दिवसरात्र कष्ट घेऊन उपचारांची पराकाष्ठा केली. याबाबत माहिती देताना डॉ. अमोल मोहिते म्हणाले, ‘दहा दिवसांनी या दोघींना येथे दाखल केले. तेव्हा दोघींची प्रकृती अतिशय गंभीर होती. एक दिवस जरी उशीर झाला असता तर पूजाचे जगणे कठीण होते. पूजाच्या आतड्याला छिद्र पडले होते. मात्र त्याही गंभीर परिस्थितीत डॉ. रणजित गिरमे यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. अवघ्या काही दिवसांतच गीताच्या प्रकृतीचा धोका टळला तर पूजाची प्रकृतीही शुक्रवार, दि. १ मे रोजी नियंत्रणात आली आहे. दोघीही आता बोलत आहेत. त्यांच्या पायाला सूज असली तरी त्या मदतीने चालत आहेत. टीव्ही पाहत आहेत. तब्बल १५ दिवसांच्या उपचारांना यश आले असून, या दोघीही पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात, यासाठी आणखी थोडा कालावधी जाईल. आता त्यांचे चेहरे पूर्वस्थितीत व्हावेत, यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या दोघींवर आधीपासूनच उपचार करणारे वरिष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. गिरमे हे ती शस्त्रक्रिया करणार आहेत.’