शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

चोरीप्रकरणी दोघांना दोन वर्षांची शिक्षा

By admin | Updated: March 25, 2017 23:48 IST

महाबळेश्वर न्यायालयाचा निर्णय

महाबळेश्वर : येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणातील दोघा आरोपींना न्यायालयाने दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ऐलान शेख (वय २४, रा. गवळी मोहल्ला) व सुशील सुर्वे (२३, रा. रांजणवाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, क्षेत्र महाबळेश्वर-डचेस रोड येथील हॉटेल गौरीशमध्ये गोव्याचे पर्यटक गुरुनाथ बांदोडकर व अमेय बांदोडकर हे १७ जून २०१६ रोजी आले होते. याच दिवशी पहाटेच्या सुमारास ऐलान शेख व सुशील सुर्वे या दोघांनी बांदोडकर यांच्या खोलीच्या खिडकीचा दरवाजा उघडून खोलीतील दोन मोबाईल व इतर वस्तू असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. बांदोडकर यांनी याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिस निरीक्षक राजेंद्र्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून ऐलान शेख व सुशील सुर्वे यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. तसेच त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद केला होता. यानंतर संबंधितांवर न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आले.दरम्यान, शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. न्यायमूर्ती पी. ए. कुंभोजकर यांनी साक्ष व पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना चोरीच्या गुन्ह्यात दोषी धरून त्यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि २५० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. बी. एन. पेटकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)