शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वाइन शॉप मालकासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : देशमुखनगर (ता. सातारा) येथील मुख्य चौकात बेकायदा, बिगर परवाना १३ देशी दारू बॉक्सची वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : देशमुखनगर (ता. सातारा) येथील मुख्य चौकात बेकायदा, बिगर परवाना १३ देशी दारू बॉक्सची वाहतूक करणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. संशयिताने कराड येथील प्रणव वाईन शॉप पाचवड फाटा कराड येथून दारूसाठा आणल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमीर गुलाब मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) व कराड येथील वाईन शॉपच्या उमेश चंदवानी (रा. लाहोटीनगर, मलकापूर कराड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, देशमुखनगर येथे दारूची चोरटी विक्री होत असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने रविवारी दुपारी सापळा लावला. पोलिसांनी महामार्गावर वॉच ठेवला असता नांदगाव बाजूकडून देशमुखनगर दिशेने येणारी सिल्व्हर रंगाची कार (एमएच ०४ सीबी ०९०६) दिसली. पोलिसांनी कार थांबवल्यानंतर त्यामध्ये पाहणी केली असता दारूचे बॉक्स होते. पोलिसांनी परवानाबाबत विचारणा केली असता चालक निरुत्तर झाला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यामध्ये ३८ हजार रुपये किमतीचे देशी दारूचे १३ बॉक्स होते. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन दारू कारसह जप्त केली. मुद्देमाल व संशयिताला बोरगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर संशयिताकडे अधिक चौकशी केली असता त्याने प्रणव वाइन शॉपमधून दारूचे बॉक्स आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला. जप्त केलेली दारू, कार असा सर्व मिळून १ लाख ३७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सपोनि रमेश गर्जे, सहायक फौजदार उत्तम दबडे, पोलीस हवालदार अतिश घाडगे, कांतीलाल नवघणे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, नीलेेश काटकर, मुनीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रमोद सावंत आदींनी भाग घेतला.