शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच व्हेंटिलेटरवर सुरू आहेत दोघांचे उपचार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळत नसतानाच आता खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळत नसतानाच आता खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेणेही अवघड होऊन बसले आहे. २४ तास व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांना तो इतरांबरोबर वाटून वापरायची वेळ सध्या वैद्यकीय क्षेत्रावर आली आहे. सहा आणि आठ व्हेंटिलेटरची क्षमता असलेल्या दवाखान्यात १५ रुग्ण दाखल झाल्याने एकाच व्हेंटिलेटरवर दोघांचे उपचार करण्याचा बाका प्रसंग रुग्णालयांवर आला आहे.

सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांचा स्फोट होऊ लागला आहे. गेल्या तीन दिवसांत हजारांचा आकडा पार केलेल्या साताऱ्यात व्हेंटिलेटर बेडची संख्या मर्यादित आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतील विषाणू अधिक आक्रमक असल्याने तरुण रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळते. २५ ते ३५ या वयोगटातील रुग्ण सध्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८५ च्या खाली येते, त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासते. सध्या रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध होणे मुश्‍किल होऊन बसले आहे. आपल्या रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नशील असलेले नातेवाईक विविध माध्यमांतून दवाखान्यात व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशा वेळी मर्यादित बेडसंख्या आणि अमर्याद रुग्णसंख्या यांचा ताळमेळ बसविणं अवघड होऊन बसलं आहे.

शासनाने संचारबंदीचा आदेश काढल्यानंतर बुधवारी साताऱ्याची बाजारपेठ पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली होती. अत्यावश्‍यक साहित्यखरेदीच्या नावाखाली उसळलेली ही गर्दी रुग्णांच्या संख्येत नक्कीच भर टाकणारी आहे. सातारकरांनीही जगणं आवश्‍यक आहे, याचं भान बाळगून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा पुढील काही दिवसांत चिलटा-मुंग्यांप्रमाणे मानवमृत्यू बघण्याची वेळ येऊन उभी राहील. प्रशासनाच्या नावाने खडे फोडत बसण्यापेक्षा स्वत:च स्वत:ची सुरक्षा करणं अधिक महत्त्वाचं बनलं आहे.

चौकट :

‘हॅपी हैपॉक्सिया’ अवस्था ठेवतेय रुग्णांना गाफील

कोविडच्या अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची हिस्ट्री काढली तर त्यात प्रत्येकाला एखाद्या दिवशी ताप येऊन गेल्याची माहिती समोर येत आहे. ताप आल्यानंतर वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतली जातात. दुसऱ्या दिवशी ताप गेला की रुग्ण बरे झाले म्हणून इतरत्र वावरतात, वैद्यकीय क्षेत्रात याला ‘हॅपी हैपॉक्सिया’ असं म्हटलं जातं. यात रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावत जाते; पण रुग्ण आनंदी दिसतो. आठ दिवसांनी या रुग्णांना धाप लागल्याची जाणीव होते. तोवर त्यांच्या फुप्फुसावर कोरोना विषाणूचा हल्ला झालेला असतो. या अवस्थेनंतर रुग्णांवर उपचार करणं जिकिरीचं होतं आणि अगदी तरुणही थेट मृत्यूच्या दाढेत पोहोचतात.

कोट :

कोविड महामारीच्या या अवस्थेत कोणताही ताप हा कोविड म्हणूनच गणला गेला पाहिजे. तापावर कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार घेणं धोक्याचं ठरू शकतं. निव्वळ अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. कोरोनाची दुसरी लाट आक्रमक असून याचा सर्वाधिक फटका तरुणाईला बसत आहे.

- डॉ. सुरेश शिंदे, सातारा हॉस्पिटल