शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरची औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरला सक्तमजुरी!

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

पाचगणी : कॅन्सर, एड्सवर उपचार करतो म्हणून रुग्णांची फसवणूक

महाबळेश्वर : ‘कॅन्सर तसेच एड्सवर आपण उपचार करतो,’ असे सांगून पैसे उकळणारा बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (वय ४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पाचगणी येथील हनुमान रोड भागात शरद साळुंखे (मूळ रा. हिपारगारावा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हा २०१२ मध्ये एड्स व कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करतो, असे सांगून रुग्णांची फसवणूक करायचा. ‘तीन इंजेक्शन घ्या,’ असे सांगून प्रत्येक इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेत होता. शरद साळुंखे याच्याकडे डॉक्टर असल्याचा कोणताही परवाना नसताना उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत आहे, अशी सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांना माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविली. शरद साळुंखे हा विना परवाना उपचाराच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाचे डॉ. हेमंत भोसले, डॉ. अभिजित हनुमंत हौस्मनी, डॉ. शंकर सुतार व वैद्यकीय सहायक सरडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक बोकडे व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी एक पथक तयार करून साळुंखे याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील स्पिरीट, कापूस, सिरिंज व विविध औषधाच्या बाटल्या, रुग्णांची नोंद असलेली डायरी ताब्यात घेतली होती.या संबंधिची फिर्याद डॉ. शंकर सुतार यांनी १ आॅगस्ट २०१२ मध्ये पोलिसांना दिली. सरकारी वकील म्हणून बी. एन. पेटकर यांनी काम पहिले. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. न्यायाधीश प्र. अ. कुंभोजकर यांनी वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३ (१) नुसार आरोपी शरद साळुंखे याला तीन वर्षे सक्त कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)एका इंजेक्शनला दहा हजार रूपयेएड्स, कॅन्सर बरा करतो, असे सांगून डॉ. शरद साळुंखे रुग्णांकडून एका इंजेक्शनसाठी दहा हजार रुपये घेत असे. अशी तीन इंजेक्शन्स तो येणाऱ्या रुग्णांना घेण्यास सांगत. अशा प्रकारे साळुंखे रुग्णांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले होत.