शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा मृतदेह अखेर बेवारस म्हणून दफन

By admin | Updated: July 10, 2017 14:29 IST

संगममाहुली नदीत आढळला होता मृतदेह

आॅनलाईन लोकमतसातारा, दि.१0 : येथील संगम माहुली नदीत आढळलेल्या दहा वर्षाच्या मुलीच्या मृतदेहाची पाचव्या दिवशीही ओळख पटली नाही. त्यामुळे संबंधित मुलीचा मृतदेह पोलिस आणि पालिका प्रशासनाने अखेर बेवारस म्हणून रविवारी दफन केला.संगम माहुली नदीमध्ये बुधवार दि ५ रोजी सायंकाळी काही ग्रामस्थांना नदीकाठी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी अंदाजे अकरा वर्षांच्या मुलाचा मृतदेह असल्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. होता, परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये हा मृतदेह मुलाचा नसून अंदाजे दहा वर्षांच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले होते.४८ तासांपेक्षा जास्त वेळ संबंधित मुलगी नदीमध्ये असल्यामुळे तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्या मुलीची ओळख पटली नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या पोलिस ठाण्यात लहान मुलगी बेपत्ता आहे का, याची पोलिसांनी माहिती घेतली. मात्र तशाप्रकारची कोठेच नोंद नसल्याचे समोर आले आहे. या मुलीला कोणीतरी बाहेरहून आणून या ठिकाणी टाकले असण्याची शक्यता असून या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यताही पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.गेल्या पाच दिवसांपासून मुलीचा मृतेदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात होता. त्या मुलीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. मात्र अखेर ओळख पटलीच नाही. त्यामुळे रविवारी दुपारी पोलिसांनी या मुलीचा मृतदेह बेवारस म्हणून दफन केला.