शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

खून जंगलात अन् वस्तरा नदीपात्रात!

By admin | Updated: November 23, 2014 00:33 IST

भारती हत्याप्रकरण : वाईतील चित्रपटाची वेळ हुकली अन् मांढरदेव डोंगरात घात झाला

वाई/मांढरदेव : खंडाळा येथे जीन्स कपडे खरेदी करून भारती भोसले आणि काका देवीचंद भोसले हे वाई येथे आले. त्याठिकाणी त्यांना चित्रपट पाहायचा होता; मात्र वेळ चुकल्याने त्यांनी ऐनवेळी मांढरदेवला जाण्याचा निर्णय घेतला अन् येथेच घात झाला आणि देवीचंदने भारतीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पिशवीवरून अवघ्या चोवीस तासांत गुन्ह्याचा छडा लावला.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, भारती ही घराघरांत चहाड्या करून भांडणे लावते, पोलिसांना फोन करून सर्वांना त्रास देते म्हणून देवीचंद जगू भोसले (वय ४९) याला तिच्याविषयी राग होता. घटना घडली त्या दिवशी बुधवारी सकाळी दहाला देवीचंद भारतीशी गोड बोलून कपडे खरेदीसाठी खंडाळा येथे नेले. त्याठिकाणी एका दुकानात कपडे खरेदी करून तेथेच भारतीने नवीन कपडे घातले. जुने कपडे कॅरिबॅगमध्ये घेऊन ते दोघे वाईला आले. त्याठिकाणी चित्रपट पाहण्याचे त्यांनी ठरविले; मात्र वेळ निघून गेल्याने ‘काळूबाईच्या दर्शनाला जाऊ,’ असे सांगून त्यांनी रिक्षातून मांढरगड गाठले. दरम्यान, देवीचंदने वाईतून वस्तरा खरेदी केला. मांढरगडला आल्यावर पाण्याची बाटली घेतली. परिसर फिरण्याच्या निमित्ताने भारतीला मंदिराच्या ईशान्येला असलेल्या दाट झाडीत नेले. त्याठिकाणी त्याने भारतीला कपडे काढण्यास सांगितले. मात्र, भारतीने आरडाओरडा करत आई-वडिलांना सांगण्याची धमकी दिली. मी त्यांना सांगितले, तर ते तुला मारतील,’ असे भारतीने म्हटल्यावर चिडून त्यांनी ‘मला मारण्यापूर्वीच तुला संपवतो,’ असे म्हणत देवीचंदने भारतीच्या गळ्यावर वस्तरा चालविला. खून केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून तो वाईला आला. गुन्ह्यात वापरलेला वस्तरा वाई येथील महागणपती मंदिराजवळील कृष्णा नदीत टाकला. त्यानंतर पाचवड येथून गाडी पकडून तो लाकडी (ता. इंदापूरला) गावी पळून गेला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रमेश गलांडे पथकासह घटनास्थळी गेले. तेथे पडलेली कॅरिबॅग व जीन्सवरून पिशवी खंडाळ्यातील दुकानातील असल्याचे समजले. संबंधित दुकानात फोन लावून दिवसभरात कोणी कपडे नेलेत का? याची माहिती घेतली. त्यांच्याकडून एका मुलीने कपडे खरेदी केल्याचे समजले. त्यावरून मृत भारती परिसरातील असल्याचा संशय आला. त्यानंतर गुराखी व मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी भारतीचे वर्णन सर्व पोलीस ठाण्यांना पाठविले. त्यावरून भुर्इंज पोलीस ठाण्यात कादर भोसलेने मुलगी भारती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याचे समजले.यावरून कादर भोसलेला पोलिसांनी बोलावून घेतले. यावेळी कादरने भारतीला ओळखले. भारतीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार देवीचंदला लाकडीतून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)