सातारा : भारती विद्यापीठाच्या डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमी, सातारा यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. १ रोजी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या इमारतीमध्ये सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार आहे. रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रभारी मुख्याध्यापिका अरुंधती गुजर यांनी केले आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लस किमान पंधरा दिवसांपूर्वी घेतलेली असणे गरजेचे आहे. किंवा कोरोना होऊन गेला असल्यास किमान एक महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला असावा, असेही विद्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी शाळेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन भारती विद्यापीठ डॉ. जे. डब्ल्यू आयरन अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.
आयरन ॲकॅडमीतर्फे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:42 IST