शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धन्य धन्य लंबोदरा.. आल्या जलधारा!

By admin | Updated: September 18, 2015 23:13 IST

बाप्पाच्या दर्शनाला पाऊस : ओढे नाले भरुन वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सातारा: ‘गणपती बाप्पा येताना पाऊस घेऊन ये...’ या आशयाचे पोस्ट सोशल मीडियावर गेले पंधरा दिवस फिरत होते. गणेशाचे गुरुवारी थाटामाटात आगमन झाले. खटावचा अपवाद वगळला, तर कोठेच गुरुवारी पाऊस झाला नाही; पण गणेशभक्तांनी तितक्याच भक्तिभावाने स्वागत केले. बाप्पाच्या दर्शनाला शुक्रवारी पहाटे चक्क वरुणराजाच आला.सातारा शहरासह महाबळेश्वर, खंडाळा, शिरवळ, माण, खटाव आदी परिसरात शुक्रवारी रिमझिम पाऊस पडत होता. यामुळे बळीराजा सुखावला असून, हातचे गेलेले पिकं वाचण्याची आशा निर्माण झाली आहे.कोणत्याही सणाची खरेदी धामधूम पावसावरच अवलंबून असते. म्हणावा असा पाऊस न झाल्यास बळीराजा साध्या पद्धतीने सण साजरे करतो. त्यामुळे बाजार पेठेतील पैसा फिरत नाही. साहजिकच बाजारपेठेलाही उतरती कळा येत असते.जिल्ह्यात जूनचा पहिला आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र, दोन महिने पावसाने पाठ फिरविली. सप्टेंबरमध्ये काही दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या आठवड्यात काहीसा पाऊस झाला. पुरेशा पावसाअभावी अनेक ठिकाणी दुबार पेरण्याची वेळ आली. बळीराजा बरोबरच सर्वसामान्य जनतेचेही पावसाकडे लक्ष लागले होते. सातारा शहरात शुक्रवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यवतेश्वरच्या डोंगरावर काळे ढग जमा झाल्याने अल्हाददायी वातावरण निर्माण झाले होते. सातारा, नागठाणे, शिवथर, लिंब परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. त्याचप्रमाणे फलटण शहरासह आदर्की, जावळी तालुक्यात मेढा, सायगाव, खटाव तालुक्यात औंध त्याचप्रमाणे महाबळेश्वर, पाटण तालुक्यातही चांगला पाऊस झाला.शिरवळ : शिरवळ व परिसरात सलग चौथ्या दिवशी शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावत शिरवळकरांना अक्षरश: झोडपले. शिरवळचा आठवडा बाजार असल्याने व्यापारी आपापल्या कामात व्यस्त होते. यावेळी सकाळी आठपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची विशेषत: विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली. पावसाने तब्बल तीन तास दमदार हजेरी लावल्याने रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते. लोहोम परिसरातही दिवसभर दमदार पाऊस झाला. यामुळे समाधानाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)आठवडा बाजारावर पाणीशिरवळचा आठवडा बाजार शुक्रवारी असतो. बाजाराची तयारीही झाली होती. शुक्रवारी पावसाला सुरूवात झाली. यामुळे आठवडा बाजारावर पाणी फिरले. तसेच गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून लोक मोठ्या संख्येने शहरात येत असतात. शुक्रवारच्या पावसामुळे सर्वांचीच पळापळ झाली. मात्र, या पावसामुळे पिण्याचे पाणी व जनावरांचा चाराप्रश्न निकालात येणार असल्याने सर्वांनीच या पावसाचे उत्साहात स्वागत केले. भर पावसातही काही गणेशभक्त छत्र्या घेऊन बाहेर पडले होते.