शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या उपमुख्याधिकाऱ्यावर ठपका

By admin | Updated: February 10, 2015 23:57 IST

विभागीय चौकशीत दोषी : बेकायदेशीर गाळे वाटल्याचा आरोप

लातूर : येथील महापालिकेचे तत्कालीन मालमत्ता व्यवस्थापक सध्या सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी म्हणून काम पाहात असलेले आर. एच. कुटकर यांच्यावर विभागीय चौकशी समितीने अनधिकृत रित्या बेकायदेशीर गाळे वितरण करणे व वापरास देण्यास दोषी ठरविले आहे. १० एप्रिल २०१३ पासून ही चौकशी सुरु होती. चौकशी समितीने चार दिवसांपूर्वी हा अहवाल महापालिकेला दिला. तो मंगळवारी बाहेर आल्याने अधिकाऱ्यात एकच खळबळ उडाली. आपल्या नगरपालिकेच्या साठ वर्षातही एकाही कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी न झालेल्या लातूरमध्ये महापालिका होताच कोणत्याही कर्मचाऱ्याची लागलेली ही पहिली विभागीय चौकशी आहे. कुटकर हे लातूर महापालिकेत सेवेत असताना विक्रांत गोजमगुंडे, शैलेश स्वामी, राहूल माकणीकर आणि असगर पटेल या चार नगरसेवकांनी तत्कालीन प्रभारी आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत पाच आरोप ठेवण्यात आले होते. डॉ. जावळीकर यांनी या आरोपांची दखल घेत शासनाच्या पॅनलवरील सेवानिवृत्त वित्त व लेखा अधिकारी बी. सी. हंगे यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०१३ ला खास समिती नेमली. या प्रकरणात चौकशी समितीने सहा साक्षीदार तपासले. या समितीने केलेल्या चौकशीत मनपाच्या गाळ्यांचे अनधिकृतरित्या वितरण करणे आणि वापरायला देणे या प्रकरणात दोषी ठरविले आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम तीनचे उल्लंघन करण्यासही अंशत: दोषी ठरविले. लातूरला १९५२ साली नगरपरिषद स्थापन झाली होती. ५२ ते २०१२ या ६० वर्षाच्या नगरपरिषदेच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी झाली नव्हती. परंतु २०१२ साली मनपा झाल्या- झाल्या पहिल्यांदाच कुटकर यांच्याविरुध्द विभागीय चौकशी नियुक्त झाली. महापालिकाच काय तर नगरपालिका असतानापासून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुध्द नेमलेली ही पहिलीच विभागीय चौकशी असल्याने याचे कुतूहल होते. ते चौकशीत दोषी आढळल्याने आता कुटेकर यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतात? याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे डोळे लागले आहेत. जर आयुक्तांनी कारवाई केली नाही तर कारवाईचा चेंडू स्थायी समिती किंवा महापालिकेची सभेकडे जाणार आहे. (प्रतिनिधी)