शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

तिरंगी लढतीत भाजपला गळती

By admin | Updated: November 2, 2016 23:10 IST

नेत्यांची डोकेदुखी वाढली : प्रभाग १२ मध्ये सर्वात जास्त उमेदवार

 फलटण :नगरपालिकेची निवडणूक प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपा, शिवसेना अशी तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपाला मोठी गळती लागल्याने त्यांचे उमेदवार शेवटपर्यंत किती राहणार हे अर्ज माघार घेण्याच्या अंतिम दिवशीच स्पष्ट होणार आहे. फलटण नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने कोणाचा अर्ज राहील, कोण फायद्याचा व कोण तोट्याचा ठरेल याचे आराखडे मांडण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत. अर्जाची छाननी प्रक्रिया संपल्यानंतर आता आपापल्या दृष्टीने काहींचे अर्ज ठेवण्याचा तर काहींचे अर्ज काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १७ तर नगरसेवकांच्या २५ जागांसाठी २०१ अर्ज दाखल झाले आहेत. अपक्षांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत. १२ प्रभागांतून दहापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने नेतेमंडळींची डोकेदुखी वाढली आहे. सर्वच प्रभागांत इच्छुकांचे अर्ज जास्त आल्याने कोणाला खाली बसवायचे. कोणाला उभे ठेवायचे याचे राजकीय आराखडे बांधण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत. तारक आणि मारक अपक्ष उमेदवारांना गळाशी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतेमंडळींचा एकास एक लढत व्हावी यासाठी अद्यापही प्रयत्न सुरूच आहे. मात्र, एकास एक जरी उमेदवार उभे करता आले नाही तरी कोणाचा अर्ज राहिला तर फायदा होईल, याचा विचार सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नीता नेवसे तर राष्ट्रीय काँग्रेसने सुवर्णा पवार व मदलसा कुंभार यांना उमेवारी दिली आहे. काँग्रेसकडून सुवर्णा पवार यांचाच नगराध्यक्षपदासाठी अर्ज राहण्याची शक्यता आहे. बसपाने रुक्मिणी मंजुळेकर यांना उमेदवारी दिली आहे. बसपाने नगरसेवक पदासाठी कोणताच उमेदवार उभा न करता फक्त नगराध्यक्षपदासाठीच उमेदवार उभा केल्याने मागासवर्गीय समाजाच्या मतदानाचा व इतर समाजाच्या मतदानाचा यातून फायदा साधण्याचा प्रयत्न बसपा करीत आहेत. (प्रतिनिधी) आराखडे बांधण्यात नेते व्यस्त ! ४नगराध्यक्षपदासाठी १७ अर्ज आल्याने प्रत्येक समाजाने आपापला उमेदवारी अर्ज भरला आहे. एवढे प्रचंड प्रमाणात आलेले अर्ज पाहता जातीपातीचा मतदानाचा परिणाम होऊ नये म्हणून नगराध्यक्षपदासाठी कमीत कमी उमेदवार उभे राहतील. यासाठी नेतेमंडळींचा प्रयत्न सुरू आहे. ४सध्या इच्छुकांच्या जास्त संख्येचे महत्त्व लक्षात घेऊनच आराखडे बांधण्यात नेतेमंडळी व्यस्त आहेत.