शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उदयनराजे भोसले यांना डावलून भाजपकडून अवमानच : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

कोरेगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींच्या ...

कोरेगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम करत आहेत. हे जनतेला चांगले माहीत आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमान केला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

वडाचीवाडी येथे सह्याद्री मंगल कार्यालयात जरंडेश्‍वर कारखाना आंदोलनविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याची चर्चा साताऱ्यात होती. मीही तसे ऐकून होतो, मात्र नुकत्याच झालेल्या विस्तारामध्ये त्यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे.’

शिंदे म्हणाले, ‘पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने ताकद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील सरकारमध्ये वजन असते. या सरकारद्वारे त्यांनी विकासकामे निश्‍चितपणे केली असती, मात्र भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करुन घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते.’

चौकट

ईडीला सळो की पळो करून सोडू

जरंडेश्‍वर कारखान्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कारखाना बंद राहिला तर शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा विषय उपस्थित होणार आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ४१ कारखान्यांविषयी तक्रार करत असतील आणि केवळ जरंडेश्‍वर कारखान्यावर ईडीची जप्तीची कारवाई होते. त्यात शंभर टक्के राजकारणच आहे. ईडीला आम्ही घाबरत नाही, एकदा का जर शेतकरी पेटून उठला तर ईडीला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय शांत बसणार नाही, हे राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.