शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे भोसले यांना डावलून भाजपकडून अवमानच : शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

कोरेगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींच्या ...

कोरेगाव : ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम करत आहेत. हे जनतेला चांगले माहीत आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमान केला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

वडाचीवाडी येथे सह्याद्री मंगल कार्यालयात जरंडेश्‍वर कारखाना आंदोलनविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार शिंदे म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम होते. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन राजीनामा द्यायला लावला असल्याची चर्चा साताऱ्यात होती. मीही तसे ऐकून होतो, मात्र नुकत्याच झालेल्या विस्तारामध्ये त्यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपने अन्याय केला आहे.’

शिंदे म्हणाले, ‘पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपने ताकद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील सरकारमध्ये वजन असते. या सरकारद्वारे त्यांनी विकासकामे निश्‍चितपणे केली असती, मात्र भाजपने त्यांचा केवळ राजकीय वापर करुन घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, याचे दु:ख वाटते.’

चौकट

‘ईडी’ला सळो की पळो करुन सोडू

जरंडेश्‍वर कारखान्याविषयी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कारखाना बंद राहिला तर शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ४१ कारखान्यांविषयी तक्रार करत असतील आणि केवळ जरंडेश्‍वर कारखान्यावर ईडीची जप्तीची कारवाई होते. तर यात शंभर टक्के राजकारणच आहे. ईडीला आम्ही घाबरत नाही, एकदा का जर शेतकरी पेटून उठला तर ईडीला सळो की पळो करुन सोडल्याशिवाय शांत बसणार नाही, हे राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला.