शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने केले सातार्‍यावर लक्ष केंद्रित

By admin | Updated: May 21, 2014 17:36 IST

संपर्क कार्यालयाचे उद््घाटन : मस्करवाडीच्या सरपंचांचा सहकार्‍यांसह पक्षप्रवेश

  सातारा : नरेंद्र मोदींच्या लाटेवर स्वार होऊन सातार्‍यातही पक्षाचे बळ वाढविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात यांच्या संपर्क कार्यालयाचे नुकतेच उद््घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमात मस्करवाडीच्या सरपंचांनी कार्यकर्त्यांसमवेत पक्षात प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मिळालेल्या कालावधीचा पक्षसंघटना बळकट करण्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून ठिकठिकाणी होणे अपेक्षितच होते. सध्याच्या अनुकूल कालावधीतच भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात यांच्या संपर्क कार्यालयाचे उद््घाटन पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष भरत पाटील उपस्थित होते. याच कार्यक्रमात मस्करवाडीचे सरपंच अभय पवार आणि त्यांचे सहकारी सुरेश माने, मच्छिंद्र पवार, सर्जेराव लिपाणे, लहुराज माने, शंकर पवार, सुहास माने, विलास माने, रमेश माने आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘दत्ताजी थोरात हे माझे जवळचे मित्र असून, मागील २५ वर्षांपासून ते एकनिष्ठपणे, विचारांशी स्थिर राहून काम करीत आहेत. एक चांगली, निकोप व निर्भय राजकीय संस्कृती निर्माण करून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे,’ असे अभय पवार यांनी सांगितले. पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हा सचिव सुहास पोरे यांनी स्वागत केले. सुहास गानू यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर गोडबोले, गोविंद लेले, ज्येष्ठ करसल्लागार सी. व्ही. दोशी, महेश शिवदे, विठ्ठल बलशेटवार, धनंजय थोरात उपस्थित होते. (प्रतिनिधी)