शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामपंचायत’बाबतचे भाजपचे दावे खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे चित्र जनतेसमोर आले असते; परंतु ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचे खोटे दावे करून भाजप गुजरात निवडणुकीतील फंडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे चित्र जनतेसमोर आले असते; परंतु ग्रामपंचायतीमध्ये यश मिळाल्याचे खोटे दावे करून भाजप गुजरात निवडणुकीतील फंडा राबवत आहे,’ अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार मुंडे बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.धनंजय मुंडे म्हणाले, ‘ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप भरघोस यश मिळाल्याचा खोटा दावा करीत आहे आणि त्यास पंतप्रधानदेखील ट्विट करून अभिनंदन करतात. हे इतिहासात प्रथमच घडले आहे. तसेच हिमाचलच्या बरोबरीने गुजरातची निवडणूक ही आयोगाने जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, गुजरातमध्ये भूमिपूजने आणि उद्घाटने करण्याची संधी मिळावी, यासाठी गुजरात निवडणूक आयोगाने घोषणा केली नाही. यावरून निवडणूक आयोग देखील सरकारच्या दबावाखाली काम करतोय का? असा प्रश्न पडतो.’सरकारने कर्जमाफी योजनेत चावडी वाचन घेऊन शेतकºयांचा अवमान केला आहे. राज्यात शेतीमालाला हमीभाव नाही, भारनियमनामुळे अर्धे राज्य अंधारात आहे. पेट्रोलसह महागाई प्रचंड वाढली असून, जनतेच्या मनात सरकार विरोधात रोष निर्माण झाला असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जेव्हा जनतेच्या लक्षात येते की, विकास होत नाही तेव्हा-तेव्हा भाजपने हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला आहे. या सरकारचे खायचे आणि दाखवायचे दोन्ही दात वेगळे आहेत, अशी टीकाही मुंडे यांनी केली.राजेंच्या वादाचा राष्ट्रवादीशी संबंध नाहीखासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये आनेवाडी टोलनाक्यावरून जो वाद सुरू आहे, त्याच्याशी राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नाही.या वादात पक्षनेतृत्वाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही वाद निर्माण झाला त्यावर पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार योग्य निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही मुंडे यांनी केले.